Thursday, December 29, 2016

अज्ञातास!


माझ्या वाफाळत्या चहात, तुझ्या कमरेचा बाक आहे,
माझ्या आयोडाईज्ड मिठात, तुझ्या पायाची कात आहे,
माझ्या साखरेच्या गोडीत, तुझा कष्टाचा घाम आहे,
माझ्या शर्टच्या सुतात, तुझ्या गळभोवतीचा फास आहे,
माझ्या घराच्या विटांमध्ये, तुझे करपलेले हात आहेत,
माझ्या लक्झरी बाथरूमसाठी, तू रौरवनरकात आहेस,
माझ्या गाडीच्या धुरात, तुझा कोंडलेला श्वास आहे,
माझ्या बाटलीबंद पाण्यात, तुझी अतृप्त तहान आहे,
माझ्या साऱ्या आरामांसाठी, तुझी जिंदगी हराम आहे,
माझ्या ज्ञात जाणिवांत, तू नेहमी अज्ञात आहेस !
तू नेहमी अज्ञात आहेस!

- विनय काटे

-  फेसबुक पोस्ट ( १० जून २०१६, ०९.३८ )

No comments:

Post a Comment