Friday, December 30, 2016

आमच्या पुराणकाळी

स्वतःच्या पत्नीच्या विरहाने व्याकुळ झालेल्या यक्षाने ढगांकरवी तिला दिलेला प्रेमसंदेश म्हणजे महाकवी कालिदासांचे 'मेघदूत' !

या काव्यातील भूभागाची वर्णने ऐकून, आमच्या पुराणकाळी विमाने होती असे दावे करणारे महाभाग खूपच बालिश म्हणायचे !!

मी सांगू काय म्हणायचं?

"आमच्या पुराणकाळी drone होते (त्यांचा शोध द्रोण यांनी लावला होता, म्हणून नाव!) आणि ते वापरून यक्ष बसल्या जागी सगळे जग पाहायचा. आणि तो जो प्रेमसंदेश मेघांना दिला होता ना, तो काही वाफेच्या ढगाला नाही तर इंटरनेट वाल्या cloud (मेघाला इंग्रज लोक cloud म्हणतात) मधून ड्रोनचे विडिओ upload केले होते आणि यक्षाच्या बायकोने ते download करून पहिले होते. आहात कुठे!!!"

-  फेसबुक पोस्ट ( १० जुलै २०१६, २१.०८ )

No comments:

Post a Comment