माणसे
खूप आदर्शवादी बोलायला लागली, प्रसिद्धीच्या आणि श्रीमंतीच्या शिड्या
पटापट चढायला लागली, थोरामोठ्यांपासून ते सामान्यांपर्यंत लोक त्यांच्या
पायात जाहीर लोटांगण घालायला लागले की समजून घ्या कुठेतरी पाणी मुरतंय !!
बालाजी तांबेचं 'गर्भसंस्कार' आणून बायकोला वाचायला, ऐकायला दे असं स्वातीच्या प्रेग्नन्सी मध्ये खूप जणांनी सांगितले. मला हा माणूस पहिल्या पासून भंकस वाटायचाच, त्यामुळे आपण कधीही याला 5 पैसे खर्चले नाहीत, ना कधी याची 'फॅमिली डॉक्टर' मधली भंकस वाचली.
गोरेगोमटे बाळ व्हावे म्हणून एकही बाळाचं चित्र आम्ही भिंतीवर लावले नाही. बाह्य रंगावर, ठेवणीवर सौंदर्य थोडीच असते?? सगळी बाळे सुंदर असतात, मग ते माझं असो की अजून कुणाचं असो. म्हणून कधी त्या 'cute baby' किंवा 'सुदृढ बालक' स्पर्धेत पण कधी पोराला पाठवलं नाही.

आणि राहिली गोष्ट गर्भसंस्कारांची.... आपल्याला कसलेही 'आदर्श बालक' सारखे
संस्कार पोरावर करायचे नाहीयेत. जिथे बापाने स्वतः सगळे बालपणीचे
धर्मसंस्कार फेकून दिले तिथे पोराला का शिकवा? पोराला नाव कबीर ठेवले, आणि
कागदोपत्री धर्माला उडवून टाकले. 18 वर्षानंतर बघेल तो काय करायचं ते
त्याच्या इच्छेने. आपल्या डोक्याला त्रास नाही
:)

No comments:
Post a Comment