Thursday, December 29, 2016

पुरीभाजी

विस्कटलेले केस, उसवलेला जुणा टी-शर्ट, बर्मुडा, पायात स्लिपर्स अशा अवतारात रस्त्याच्या कडेच्या छोटया टपरीमध्ये पुरीभाजी खातोय. रात्रीचा पडून गेलेला पाऊस हवेत शिरशिरी आणणारा गारवा घेऊन आलाय. समोरचे धोतर-शर्ट घातलेले, गळयात मळका टॉवेल गुंडाळलेले गृहस्थ मस्त बिडी ओढत मलाही थोडा धूर देतायत. पेपरात पानेच्या पाने भरून 'तेलंगणा दिन' च्या जाहिराती पाहत आम्ही दोघेही मस्त बसलोय.

शिक्षण, संस्कार आणि उत्पन्नामुळे येणाऱ्या स्वच्छता, शुचिर्भूतता असल्या मुखवट्या मागील माणूसघाण्या 'क्लास आणि कास्ट मेंटलिटी' पासून मी कायम दूर राहतो. बुद्धिबळाचा खेळ संपला कि राजा आणि प्यादे एकाच पेटीत जातात.

- फेसबुक पोस्ट ( २ जून २०१६, ०८.५५ )

No comments:

Post a Comment