डोनाल्ड ट्रम्प हा मनुष्य धर्मातिरेकी गाढव आहे याबद्दल मला कसलाही
संदेह नाही. पण, त्याच्या उमेदवारीला विरोध करताना त्याच्या पत्नीची,
मेलनिया ची मॉडेलिंगच्या काळातली नग्न छायाचित्रे अमेरिकन मीडियाने छापून
"अशी फर्स्ट लेडी तुम्हाला चालेल का?" असले मथळे लिहिले.
डोनाल्ड ट्रम्प ची बायको हि पॉर्नस्टार जरी असती तरी त्याचा ट्रम्पच्या उमेदवारीशी काय संबंध? कुणीही नेता व्हायचे असेल तर त्याची बायको सतीसावित्री, त्याचे सर्वकाळ ऐकणारी का पाहिजे? बाईला दाबून ठेवता आले म्हणजेच पुरुष नेतृत्वगुणांनी युक्त होतो का?

"कुणाच्या बुडाखाली किती अंधार आहे.... आधी घरच्या बायका सांभाळा म्हणावं"
ही फालतू पुरुषी मानसिकता अमेरिकेत सुद्धा यावी याचं विशेष वाटले.
मला नरेंद्र मोदी आवडत नाहीत, पण म्हणून मी त्यांच्या पत्नीवर, आईवर किंवा सार्वजनिक जीवनात नसलेल्या इतर कुठल्याही कुटुंबियांच्या वैयक्तिक गोष्टींवर एक शब्दाने खालच्या दर्जाची टीका करणार नाही. आणि मोदींनी सुद्धा "50 करोड कि गर्लफ्रेंड" किंवा उजव्या नेत्यांनी नेहमी केलेले सोनिया गांधींचे शाब्दिक चारित्र्यहनन मला मान्य नाही. दिग्गी राजाचे "100% टंच माल" असो की स्मृती इराणींवर डाव्यांनी केलेली अश्लाघ्य टीका ... सगळेच अमान्य !!!
स्त्रीला तिचे स्वतंत्र आयुष्य, ईच्छा, निर्णयक्षमता, निवडी आणि तिच्यासोबतच्या पुरुषांशी न जोडले गेलेले स्वतंत्र अस्तित्व आहे. मग ती स्त्री तुमची किंवा कुणाचीही आई असो, बायको असो, मुलगी असो, GF असो, लिव्ह इन पार्टनर असो की सख्खी बहीण असो !
- फेसबुक पोस्ट ( ०१ ऑगस्ट २०१६, १६.१४ )

No comments:
Post a Comment