माझ्या cover photo मध्ये या साहेबांना आक्षेप आहे. ते म्हणतायत हा फोटो उत्ताण आहे.
ही असली गाढवं कुठून फेसबुकवर येतात?आणि इंग्रजी तरी का शिकतात? आणि त्यात काशी करायला माझ्या वॉल वर कशाला येतात? भूर्जपत्रांवर लिहीत बसायचं की बोरू दौतीत बुडवत! आयला त्या भूर्जपत्रावरून आठवलं की त्यावर लिहिणारे वात्सायन ऋषी तर थेट सेक्सबद्दलच बोलायचे.
चित्रकला आणि त्यामध्ये असणारी मानवी देहाची पेंटिंग्स हे काय नवीन आहे का? मी ज्याचा फोटो लावलाय ते चित्र हैद्राबादच्या सालारजंग म्युझिअम मध्ये Western Gallery मध्ये प्रवेश करतानाच लावलंय. किमान 111 वर्ष जुनं चित्र आहे हे. पण याची कलात्मक किंमत इथल्या संस्कृतीरक्षक गाढवांना काय माहित असणार? राजा रवी वर्मा, आबालाल रहमान, गायतोंडे, हुसेन, रझा, गुजराल हे यांना ऐकून पण माहित नसतील.
बाकी मी मानवी शरीराच्या कला, विज्ञान आदी गोष्टींसाठी जाहीर नग्न प्रदर्शनाच्या पूर्ण बाजूने आहे. मेडिकल कॉलेजला असताना ज्या स्त्री-पुरुष मृतदेहांवर Anatomy शिकलो ते एकही मृतदेह कपडे घातलेले नव्हते तर पूर्ण नग्न होते, आणि त्यांच्या नग्नतेने आम्हाला कधी फरक पडला नाही. Fashion TV वर Pirelli चे कॅलेंडर्स मला प्रचंड आवडतात ज्यात पूर्ण नग्नता असते. Nude modelling हा एक सुंदर कलाविष्कार आहे आणि सोबतच Nude paintings सुद्धा. युरोपात कित्येक मुली nude model म्हणून अगदी तासांवर पैसे घेतात पेंटर्सकडून, फोटोग्राफर्स कडून. त्या काही वेश्या नसतात. आणि असल्या तरी मला त्यांच्याबद्दल सुद्धा अतीव आदर आहे.
माझ्या cover photo मधल्या Biblis ला पाहत मी तासन तास घालावलेत, इतकं सुंदर चित्र आहे ते. मला त्या चित्रात सेक्स दिसत नाही. माझ्या नितांत सुंदर मैत्रिणींमध्ये मला उत्तानपणा दिसत नाही मग त्या काहीही कपड्यात असोत. माझ्या पेशंटकडे तर चुकूनही मी सौंदर्यशास्त्र मनात ठेवून पाहिलं नाही. आणि सार्वजनिक ठिकाणी स्वतःच्या लहान बाळांना पाजणाऱ्या स्तनदा स्त्रियांचा पदर सरकला तरी मला त्यांच्या स्तनांमध्ये तेव्हा सेक्स दिसत नाही, उलट त्यांच्यातलं आईच प्रेम दिसतं.
एखादे painting पाहून जर तुमच्या वासना चाळवल्या जात असतील किंवा एखाद्या देवीचे नग्न चित्र पाहून जर तुमच्या धर्मभावना उफाळून येत असतील तर तुम्ही चुतीये आहात. स्वतःची पुराणे वाचून पहा, पॉर्नला लाजवतील!!
- डॉ. विनय काटे
फेसबुक पोस्ट ( १७ डिसेंबर २०१६, १६.५८ )
No comments:
Post a Comment