मला मुसलमानांची, त्यांच्या अल्पसंख्याक असण्याची भीती किंवा काळजी वाटत नाही कारण ते माझे वैरी नाहीत.
मला हिंदूंची, त्यांच्या बहुसंख्यांक असण्याची भीती किंवा काळजी वाटत नाही कारण तेही माझे वैरी नाहीत.
मला काळजी वाटते ती माझ्या देशाला लागलेल्या धर्मांध किडीची... जी
वेगवेगळ्या संघटनांची नावे वापरत इथली शांतता बिघडवत असली तरी तुझ्या
पायाशी एकरूप होऊन नतमस्तक होते, या देशाला हिंदुराष्ट्र बनवायचे स्वप्न
पाहत.
मला काळजी वाटते तुझ्यासारख्या किडीला प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्या धर्मांमध्ये वाढणाऱ्या इतर किडींची ज्यांना या देशात विनाकारण भय वाटतं आणि इथल्या लोकशाही व्यवस्थेपेक्षा बाहेरचे शरिया कायदे ईश्वरी वाटतात.
सुदैवाने, इथले 99% हिंदू आणि मुसलमान मानवता जपत, शांततापूर्ण सहजीवनात आनंद मानणारे आहेत आणि उरलेले 1% धर्मांध तुमच्या हिंदुराष्ट्र आणि मुस्लिमराष्ट्र या नालायकपणात अंध झालेले आहेत.
या 99% मधल्या काहींना, तुम्ही सर्व धर्मांचे कट्टरवादी थोड्या काळ फसवून सत्तेत आला तरी लोकांचे डोळे उघडायला लागलेले आहेत. ते डोळे अजून चांगले उघडत जातील येत्या काही वर्षात आणि आज दिसणारी तुम्हा समस्त कट्टरपंथीयांची संख्या हळूहळू खूप रोडावत जाणार आहे.
तेव्हा लोकांच्या बायकांना जास्त मुले जन्माला घालायला लावण्यापेक्षा स्वतःच्या संसाराचं काय जमतंय का बघ या वयात. मुलबाळ नाही झाले तरी हरकत नाही, पण एखाद्या स्त्रीच्या निस्वार्थ प्रेमाने तरी तुमच्या सडक्या मेंदूतील द्वेषाची जळमटे बऱ्यापैकी निघायला मदत होईल.
- फेसबुक पोस्ट ( २३ ऑगस्ट २०१६, २१.५६ )

No comments:
Post a Comment