140kbps च्या सुपरफास्ट ISDN कनेक्शन वर 5-6 कॉम्प्युटर नेट कॅफेत LAN ने जोडलेत. Windows 98 च्या latest pirated system वर internet explorer मध्ये www.yahoo.com टाकून वरच्या उजव्या कोपऱ्यात फिरणारी छोटी पृथ्वी 2 मिनिट डोळे भरून पाहावी. त्यानंतर पेज हळूहळू लोड व्हावे. Inbox मध्ये एखादा ईमेल दिसला तरी गगन ठेंगणे वाटायचे. एखाद्या मैत्रिणीला मग yahoo वरूनच greeting पाठवावे. आणि तिने ते वाचले कि रिपोर्ट द्या म्हणून yahoo कडे लाडिक हट्ट सुद्धा धरायचा.
Chat rooms मध्ये शिरून जगातल्या कुठल्याही मुलीला/बाईला asl विचारून हैराण करावे. तिच्या age वरून स्वतःचे age कमी जास्त करावे, तिकडे तीही (तोही) आपले sex पाहून त्याचे/तिचे sex क्षणात बदलावा. Yahoo messenger च्या desktop application मधील मित्र यादीत लोकांना जोडत जावे. त्यात कुणी परदेशी पोरगी ऑनलाइन दिसली कि 'दिल गार्डन गार्डन' व्हावा. कधी तिचा फोटो पाहावा, कधी वेळ ठरवून online यावे. तिने कधी Falling hearts चे IM environment निवडावे, आणि त्यात buzz करून एक दिसणारा lip marks आणि सोबत smooch चा कातिल आवाज. हवंय काय महाराजा आयुष्यात अजून??
कधी आपल्या देसी बाबा, मामा, दूधवाली, व्हाईट हाऊस ला शरण जावे. रवीना
टंडन सोबत संजय दत्त चे तद्दन टुकार photoshop केलेले फोटोस download करून
हे खरे असते असे मित्रांमध्ये एकमेकाला सांगावे. NFS मध्ये कर चालवावी.
Quake, Counter Strike वर मित्रांसोबत कल्ला करत दिवस दिवस नेट कॅफेत पडून
राहावे. CD भाड्याने आणाव्यात, त्या copy करताना नेमक्या 98% copy होऊन
abort व्हाव्यात. Hard disk टू Hard disk कॉपी करताना जंपर बदलून मास्टर,
स्लेव्ह ची व्यवस्था समजून घ्यावी. SATA ची लाल पिन मदरबोर्डवर कुठे लावावी
हे ज्ञात झाल्यावरचा आनंद, महिन्यात दुसऱ्यांदा PC format करावा लागण्याच
दुःख सारेच अवर्णनीय.
16 वर्षांपूर्वी ताशी 25- 30 रुपये देऊन वापरलेले इंटरनेट आज उत्पन्न 50 पट होऊन सुद्धा, त्याच दराने वापरायला जीव धजणार नाही. CRT वाल्या desktop च्या जागी 2K वाले laptop आले, पण मॉर्फ केलेल्या चित्रांची मजा आता नाही. नेट कॅफेचं शटर उघडायला आणि बंद करायला जातीने हजर असणारा मी आज घरात 50mbps चं broadband पण नावापुरते वापरतोय. Chat rooms मध्ये प्रेम करणारे आम्ही आता फेसबुक वर भांडतोय. जगातला ताणतणाव घरात, आणि घरातली जवळची लोक आभासी जगात भेटायला लागलीत. आयुष्य खरंच खूप क्लिष्ट झालंय गेल्या 15-16 वर्षात.
खरंच, काय सुंदर दिवस होते ते!
डॉ. विनय काटे
- फेसबुक पोस्ट ( ०६ जुलै २०१६, २०.०९ )

No comments:
Post a Comment