खंडेराव, मला माहितेय तुझ्या बालपणापासून आजवर तुला जे काही संस्कार दिले गेले ते तुला सहज टाकता येणार नाहीत. वर्ण आणि पुरुषी वर्चस्वाचा पगडा एवढा सहजासहजी उतरणार नाही.
पण, खंडेराव जग प्रचंड वेगाने बदलतंय. गावच्या पडक्या लायब्ररी मधून २-४ ऐतिहासिक पुस्तके वाचून ज्ञानी असल्याच्या थाटात फिरायचे दिवस आता संपतयात, कारण त्या पुस्तकांनाच मोडीत काढणारा खरा इतिहास हळूहळू बाहेर येतोय. ज्यांच्यावर भाषणे ठोकीत शाळा गाजवल्यास, ज्यांच्या बद्दल जाज्वल्य अभिमान बाळगत तारुण्यात तुझे रक्त पेटून उठले, ते महापुरुष आज त्यांच्याच शब्दांच्या आणि लपवलेल्या कृतीच्या उघड होण्याने अतिसामान्य आणि कालबाह्य सिद्ध होत आहेत. किती वेळ त्यांचा बचाव करू शकशील तू तरी?
माहिती तंत्रज्ञानाने आज हे सगळे ज्ञान सामान्यातल्या सामान्य माणसाला
सुद्धा घरबसल्या मिळतंय. कसं थांबवणार याला तू खंडेराव? ज्यांना शिक्षण
नाकारून तू स्वतःच श्रेष्ठत्व ठेवले होतेस, त्यांना शिक्षण मिळाल्यावर पण
तू त्यांच्या पाठयपुस्तकात स्वतःची महती गायलीस, पण आता ते ती महती गायला
नकार देत आहेत. कारण, त्यांचे डोळे उघडतायत आणि मेंदू सुद्धा. किती
पुस्तकांवर आणि किती माध्यमांवर बंदी आणशील तू तरी?
पैसा आज एका सेकंदात एका हातातून दुसऱ्या हातात वाहतोय. गावातला व्यवसाय/शेती जगाच्या बाजारपेठेत विक्रय करतोय आता, आणि तुझ्या मध्यस्थीची गरज आता जवळपास संपणार आहे. धर्माच हाडूक दाखवून तू ४ पिसाळलेल्या कुत्र्यांना भुंकायला, चावायला लावशीलही, पण हळूहळू ती कुत्री सुद्धा तुझ्यावरच उलटतील जेव्हा त्यांना तुझी मखलाशी कळेल. याचा अनुभव तुला आधी पण आलाय, पण तू काही शिकत नाहीस गड्या.
खंडेराव, माहिती तंत्रज्ञानाच्या विश्वात, उद्योगात तुला first mover advantage मिळाला कारण व्यवस्था तुझ्या बाजूला झुकली होती तेव्हा. सोशल मीडिया वर आधी वर्चस्व गाजवत, लोकांना भुलवून तू सरकारं सुद्धा निवडून आणलीस. पण, आता ती सरकारे नतद्रष्ट सिद्ध होतायत. भुकेली, आत्मसन्मान दुखावलेली लोक फार काळ शांत राहत नाहीत. तेव्हा, आता तरी शहाणा हो आणि जे चुकीचं आहे त्याला चूक म्हणायला शिक. तुझा first mover advantage संपलाय आता खंडेराव. लोक सरकारला "बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल" असे म्हणतात आजकाल.
खंडेराव, मला माहित आहे तू खूप त्रासात आहेस. तुझं आभाळ फाटायला लागलंय. त्याला ठिगळ लावून, रोज किल्ला लढवत बसून काय होणार आहे? तुझ्या कधीकळीच्या पवित्र पुस्तकांच्या पानावर लोक आता भेळ खातात आणि सक्ती केली तरी तुझी विद्वान भाषा शिकायला ते तयार नाहीत. म्हणून सांगतोय खंडेराव, लवकर शहाणा हो. काळाची पावले ओळखून घे, आणि बदलाची सवय लावून घे. तू धोरणी आहेस हे मला माहित आहे म्हणूनच तुझ्या विषयीच्या प्रेमाने सांगतोय. बाकी तुझी ईच्छा!
डॉ. विनय काटे
- फेसबुक पोस्ट ( ०३ ऑगस्ट २०१६, ०७.१२ )

No comments:
Post a Comment