अवघ्या 22 वर्षाचा, अंगाने छोटासा दिसणारा हा वैभव मला अलीकडेच भेटला. पहिल्या भेटीत इतर मित्रांकडून त्याच बरंच कौतुक ऐकलं पण वेळेअभावी त्याला जास्त बोलू शकलो नाही. नंतरच्या 2-3 भेटीत या बालकाचे थोरपण हळूहळू उमगू लागले.
मूळ कोल्हापूर जिल्ह्यातला वैभव अत्यंत साधारण कुटुंबातून येतो. आई-वडील, कुटुंबीय यांचा कुठलाही आधार नसताना हा मुलगा स्वतःच्या हिमतीवर मुंबईसारख्या ठिकाणी राहून शिकत आहे. आणि नुसताच शिकत नाही तर सोबत स्वतःचा छोटासा व्यवसाय पण करतोय. इंजिनीअरिंग कॉलेज सोबतच त्याच्या आवडीचं Political Science आणि Economics पण शिकतोय मुक्त विद्यपीठातून.
याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे हा वैभव एक सक्रिय समाजसेवक आहे. मुंबईमधील
रस्त्यावर कित्येक भीक मागणाऱ्या, अनाथ मुलांना वैभव ने शिक्षणाच्या
प्रवाहात आणलंय. शाळेत दाखला करण्यासाठीची कागदपत्रे सहसा या मुलांकडे
नसतात, तेव्हा वैभवने सरकारी अधिकारी, समाजसेवक, सामाजिक संस्था यांचे जाळे
जोडून त्यातून ही कागदपत्रे मिळवून त्यांना शाळेत दाखल केलंय. जी मुले
अनाथ आहेत अशा कित्येक मुलांना त्याने मान्यताप्राप्त अनाथाश्रमात भरती
करून एक सुरक्षित बालपण दिलंय आणि भविष्याची एक आशा पण. जेव्हा ही बाळे
वैभव ला भेटतात तेव्हा बऱ्याचदा त्यांना खायला नसतं, कपडे नसतात, तेव्हा
वैभव स्वतःच्या छोटयाशा उत्पन्नातून पण त्यांना कपडे, अन्न देऊन त्यांची
पुढची व्यवस्था करून देतो. आणि हे सगळं कुठलीही प्रसिद्धीची, पैशाची
अपेक्षा ना ठेवता.
रस्त्यावर भीक मागणारी, अनाथ मुले पाहून गाडीच्या खिडकीच्या काचा वर करत दुसरीकडे पाहणाऱ्या समाजात वैभव सारखे युवक एक आशेचा किरण आहेत. त्याच्या वयाच्या, आर्थिक ऐपतीच्या मानाने किती तरी पटीने मोठं काम वैभव आज करतोय. कुटूंबाचा आधार नसल्यावर भले भले लोक मोडून पडतात, पण वैभव एकटाच घट्ट पाय रोवून उभा आहे आणि त्याच्यासारखंच आयुष्य जगणाऱ्या कित्येक मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचं आयुष्य उज्ज्वल करतोय.
आज वैभवचा वाढदिवस आहे आणि विशेष म्हणजे त्याने कुणालाही न सांगता, एका अनाथाश्रमाने त्याला बोलवून त्याचा छानसा वाढदिवस त्यांच्याकडे साजरा केला. दुसऱ्यांनी त्याचा वाढदिवस साजरा करावा हेच वैभवच्या कार्याचे मोठेपण आहे.
Vaibhav , शतायुषी भव! तुला खूप सारे प्रेम आणि शुभेच्छा !
- फेसबुक पोस्ट ( २ जून २०१६, २२.१० )

No comments:
Post a Comment