कुतुहूल म्हणून हाजी अली बद्दल विकिपीडिया वर माहिती वाचली. नेहमीसारख्या चमत्कारिक गोष्टी वाचायला मिळाल्या जसे की त्यांनी जमिनीत बोट खुपसून तेल बाहेर काढले, ते मक्केला जाताना मृत्यू पावले पण त्यांचे शव एका शवपेटीत तरंगत परत वरळीच्या खाडीत आले आणि तिथेच हा दर्गा उभारला गेला. हे सगळे झाले 15 व्या शतकात, म्हणजे हाजी अली हे आपल्या अजून एक चमत्कारी साई बाबांच्या गोत्राचे आद्यपुरुष. तसेच चमत्कार ... तसाच भक्तपरिवार!
सोलापूर जिल्ह्यातल्या अकलूजच्या नीरा नदी पलीकडे पुणे जिल्ह्यात येणारे लुमेवाडी (मुसलमान वाडी पण म्हणतात) नावाचे गाव आहे. तिथे साधारण 1990 च्या आसपास कुठून तरी (कदाचित जोधपूर हून) एक असेच बाबा आले... त्यांच नाव हाजी हाफिज फतेह मोहम्मद जोधपुरी. आणि मग त्यांच्या चमत्काराच्या सुरस कहाण्या, माझ्या आजोबांच्या शेतात कामाला येणाऱ्या अडाणी मजुरांकडून ऐकायला मिळू लागल्या. जसे की हाफ़ीसाहेबांना बसच्या कंडक्टरने तिकीट काढायला पैसे नाहीत म्हणून खाली उतरवले आणि नंतर ते अंतर्धान पावून क्षणात त्या बसच्या शेवटच्या थांब्यावर कंडक्टरच्या स्वागताला कित्येक तास आधी उभे! हाफ़ीसाहेबांना साक्षात पैगंबरांचा आशीर्वाद प्राप्त झाला इत्यादी!
1990
च्या दशकातच हाफ़ीसाहेब लुमेवाडी मध्ये अल्लाहला प्यारे झाले. आज लुमेवाडी
मध्ये हाफ़ीसाहेबांचा मोठा दर्गा उभा आहे आणि लोक दुरदुरुन येतात तिथे
नेहमीप्रमाणे नवस बोलायला. त्यांच्यावर गाणी रचली जातायत आणि काही व्हिडिओ
youtube वर पण पाहायला मिळतील. हाजी अली आणि साईबाबा सारखा अजून एक नवसाला
पावणारा बाबा हळूहळू लोकप्रिय होत जाईल. अडाणी लोक भुलत जातील आणि चाणाक्ष
लोक त्यांच्या नावाने अजून नवे चमत्कार, नव्या अफवा पसरवत राहतील. एकदोन
सेलेब्रिटी यायला लागले तर हाफ़ीसाहेब ची मार्केट value पण वाढेल.
काही वर्षांनी हाफ़ीसाहेबच्या दर्ग्यात पण मजारी जवळ बायकांना प्रवेश हवा म्हणून आंदोलन, कोर्टकचेऱ्या होतील. होऊ द्यात.... भक्तिभावाने नमस्कार करा, नवस बोला, जाळीला दोरे बांधा, ताईत बांधा, बकरी कापा. अजमेर शरीफ, सलीम चिश्ती सारखे हाफ़ीसाहेब ना पण वलय प्राप्त करून द्या. महाराष्ट्राने पण उत्तर भारतीय हाजी बाबांच्या तोडीचे बाबा निर्माण केले पाहिजेत, तिथे स्त्री-पुरुष समानता दाखवावी, तरच काही तोंड राहील ना आपल्याला त्यांना दाखवायला!
तर छोट्या गाव-शहराच्या बाबा-महाराज लोकांनो, तुम्हाला मोठे, नामांकित, नवसाला पावणारे बाबा व्हायचे असेल तर नक्की संपर्क साधा. तुमचे branding करून देण्यास आवडेल मला! तुमचे आशिर्वाद वगैरे नकोत, मोजून पैसे घेईन त्या कामाचे!
डॉ. विनय काटे
- फेसबुक पोस्ट ( २६ ऑगस्ट २०१६, २०.३४ )

No comments:
Post a Comment