Thursday, December 29, 2016

पाकिस्तानी 'भक्ताचे' मनोगत

आमचा वजीर-ए-आझम ना म्हणजे अल्लाहची रेहमत आहे आपल्या देशावर. शेजारच्या देशाचा पंतप्रधान पण आला ना बस मध्ये बसून त्यांना भेटायला.... पाहिलंय कधी कुठला पंतप्रधान बस मध्ये बसून असं भेटायला आलेला? पण त्याने इतकी गोडीगुलाबी करून पण वजीर-ए-आझम ने देशासाठी, धर्मासाठी त्या देशाशी लागलीच केले ना युद्ध!

परकीय शक्तींनी वजीर-ए-आझम वर मुद्दाम आरोप करून बरखास्त केले, देश सोडायला भाग पाडले. पण वजीर-ए-आझम हरला नाही. दुसऱ्या देशात बसून पण जगभरात सूत्रे हलवली आणि परत येऊन निवडणूक सुद्धा जिंकली. आता तर तो इम्रान पण गार पडलाय आणि त्या बेनझीर च्या कुटुंबाला कुठे औषधाला पण ठेवलं नाही.

अमेरिका सुद्धा दहशतवादाच्या विरोधात वजीर-ए-आझम शिवाय लढा अपूर्ण राहील असे सांगते, भाषण द्यायला बोलावते. आणि शेजारी देश? एकाच्या बदल्यात दहा मुंडकी आणू वगैरे बोलणाऱ्यांच्या देशात अजून घुसखोरी करतोय आपण, आणि वरून त्यांच्या देशात जाऊन आपणच हल्ल्यांची चौकशी करतोय. त्यांच्या देशाच्या कोर्टाने शिक्षा दिलेल्या लोकांना वजीर-ए-आझम मस्त उघड पाळून आहे आपल्या देशात. आणि त्या देशाचा पंतप्रधान तरीसुद्धा त्याच्या शपथविधी ला वजीर-ए-आझम ला बोलावतो. एवढंच काय वजीर-ए-आझम च्या वाढदिवसाला स्वतःहुन न बोलावता येऊन दावत मध्ये शरीक पण होऊन जातो.

वजीर-ए-आझम सारखा मोठा नेता होणारच नाही कधी आपल्या देशात!

- पाकिस्तानी 'भक्ताचे' मनोगत!

-  फेसबुक पोस्ट ( ९ जून २०१६, १३.४४ )

No comments:

Post a Comment