काल रात्री एका दुसऱ्या प्राध्यापक महाशयांचा अचानक मेसेज inbox मध्ये धडकला "तुझ्या पोस्ट अन कमेंट वरुन तु xyz पक्षाचा पाळीव आहे असे जानवते." मी दचकलोच विचार करून की हे काय एकदम!
माझ्या पोस्टमधून मी सर्वच पक्षांच्या नेत्यांच्या मूर्खपणाला विरोध केलेला आहे आजवर. आणि त्याच नेत्यांनी जेव्हा काही चांगलं बोललं किंवा कृती केली तेव्हा त्याचं कौतुकही केलंय. मी व्यक्तीला विरोध करत नाही प्रवृत्तीला करतो. कुठल्याही नेत्याचा, विचारांचा, धर्माचा आणि संकल्पनेचा सकारण-अकारण सार्वत्रिक आणि सार्वकालिक उदे किंवा विरोध करायला मी पोथीनिष्ठ निर्बुद्ध नाही. आणि माझ्या समविचारी किंवा विरोधी मताच्या माणसांना stereotype करून त्यांचा वैयक्तिक आंधळा अनुनय किंवा विरोध करायला मी कुणाच्या ताटाखालचं मांजर नाही.
माझं घर कुणा देवा, धर्माच्या आणि पक्षाच्या पैशावर/भिकेवर चालत नाही आणि
चालणार पण नाही कधी. लोकशाहीत मला माझं मत व्यक्त करायचा हक्क आहे. आणि
माझं मत तुमच्या विरोधी आहे म्हणून मला अमुक-तमुक वादी म्हणून तुम्ही फक्त
तुमचा मूर्खपणा सिद्ध करताय. तुम्हाला बरं वाटावं किंवा तुमच्या विरोधकांना
त्रास व्हावा म्हणून मी माझी मते मांडत नाही. तुमचे साप तुमच्या काठीने
मारा आणि तुमच्या पायावर उभे रहा कारण मी तुमची काठी नाहीये.
आज ना या प्राध्यापकांच, ना धर्म-पक्ष-नेत्यांचं नाव घेतोय कारण हा मूर्खपणा सार्वत्रिक आहे. कुणाकडून विनाकारण 'पाळीव' वगैरे शब्द ऐकून घ्यायला मी कुत्रा नाहीये, आणि तुम्हाला मी तुमच्यातील आहे हे सिद्ध करून दाखवायला मी गाढव नाहीये.
कबीरा खडा बझार में, लिये लुकाठी हाथ,
जो घर फुंके आपना, चलो हमारे साथ !
- फेसबुक पोस्ट ( २७ मे २०१६, १३.२० )
आज ना या प्राध्यापकांच, ना धर्म-पक्ष-नेत्यांचं नाव घेतोय कारण हा मूर्खपणा सार्वत्रिक आहे. कुणाकडून विनाकारण 'पाळीव' वगैरे शब्द ऐकून घ्यायला मी कुत्रा नाहीये, आणि तुम्हाला मी तुमच्यातील आहे हे सिद्ध करून दाखवायला मी गाढव नाहीये.
कबीरा खडा बझार में, लिये लुकाठी हाथ,
जो घर फुंके आपना, चलो हमारे साथ !
- फेसबुक पोस्ट ( २७ मे २०१६, १३.२० )
No comments:
Post a Comment