कुठल्याही आधुनिक गोष्टीला मराठी प्रतिशब्द काय असे पुढच्या माणसाला विचारून निरुत्तर करून स्वतःचा अल्पमती कंड शमवणाऱ्या एका खत्रूड म्हाताऱ्याने खानावळीत मला विचारले,"ट्रेन ला मराठीमध्ये काय म्हणतात सांग बरे?"
तथाकथित उत्तर (खरंतर ते उत्तर नाहीये कारण ट्रेनचा शोध महाराष्ट्रात लागलाच नाही !) माहित असूनही मी मुद्दाम गप्प राहिलो कि बघू काय होतंय. म्हातारा अफाट खुश झाला आणि कुजके भाव चेहऱ्यावर आणत म्हणाला,"तुम्हाला एवढं माहित नाही आणि कसे काय डॉक्टर बनताय?" वास्तविक असल्या मूर्ख प्रश्नांचा आणि वैद्यकाचा काही संबंध नाही, आणि असलाच तर तो फक्त 'मेंटल हॉस्पिटल' शी आहे.
मग मीही मेंदूचे घोडे उधळवले आणि मिनिटभराच्या आतच आनंदाच्या शिखरावर
विराजमान म्हाताऱ्याला विचारले,"काका, ब्रा (हो, महिलांची वालीच) ला मराठीत
काय म्हणतात हो?". काकांच विमान crash-land व्हायला लागलं होत हे
त्यांच्या चेहऱ्यावरून दिसायला लागलं. थोड्या वेळानंतर त्यांनी नकारात्मक
मान हलवल्यावर मी म्हणालो,"अहो स्तनाधारपट्टिका ! तुम्हाला एवढं साधं माहित
नाही? तरुणपण वाया गेलं तुमचं !!"
त्या दिवसानंतर तो म्हातारा मराठी भाषेला एक नवा शब्द देणाऱ्या या बालबृहस्पतीच्या वाटेला कधी गेला नाही.
- फेसबुक पोस्ट ( ८ जून २०१६, ०९.४१ )
त्या दिवसानंतर तो म्हातारा मराठी भाषेला एक नवा शब्द देणाऱ्या या बालबृहस्पतीच्या वाटेला कधी गेला नाही.
- फेसबुक पोस्ट ( ८ जून २०१६, ०९.४१ )
No comments:
Post a Comment