नागराज तुम्हाला सकारात्मकतेच्या उंचीवर घेऊन जातो आणि एका झटक्यात तुमचा दोर कापून टाकतो. एक free fall देतो तुम्हाला वास्तवाशी भिडवायला. संवेदनांचा कल्लोळ होतो, मनातल्या गृहितकांच्या ठिकऱ्या ठिकऱ्या होतात आणि एक शांतता पसरते सर्वत्र... बाहेर आणि आत.
आतली शांतता नंतर उठणाऱ्या विचारांच्या वादळाची पूर्वसूचना असते फक्त! या शांततेत एका क्रांतीच बीज रोवून जातो नागराज तुमच्या मनात.
नागराज, हे फक्त तुलाच शक्य आहे. सैराट बद्दल आज फक्त एवढंच!
- फेसबुक पोस्ट (३० एप्रिल २०१६, १९.०१ )
- फेसबुक पोस्ट (३० एप्रिल २०१६, १९.०१ )
No comments:
Post a Comment