मेडिकल कॉलेजला असताना मॉर्निंग वॉकला जायचो, तेव्हा या आर्चिशी ओळख झाली. हळूहळू छान मैत्री पण झाली. घरंदाज राहणे, बोलणे आणि वागणे आणि चेहऱ्यावर नेहमी हास्य, त्यामुळे कधी हिला काही त्रास असेल असे वाटले नव्हते. जेव्हा काही वेळा घरी गेलो तिच्या तेव्हा कळलं कि परिस्थिती दिसते तशी नाहीये. वडील रिटायर झालेले, नाममात्र पेन्शन, मोठा भाऊ कमी पगाराच्या नोकरीवर, आर्चि आणि धाकटी बहीण तेव्हा अविवाहित होत्या. आणि या सगळ्या घराचा गाडा हि आर्चि हाकत होती.
तिची नोकरी मेडिकल रिप्रेसेंटेटिव्ह (MR) ची. त्यामुळे दिवसाला 100 -150 किमी बाईक चालवणे हिच्या डाव्या हातचा खेळ. आयुष्यात मुलींच्या मागे बाईक वर बसायचे प्रसंग कमी आले पण या आर्चि सोबत सांगली, कोल्हापूर च्या भागात मागे बसून बरेच डॉक्टरचे दवाखाने, मेडिकल स्टोअर्स पालथी घातली. थक्क व्हायचो तिचा आत्मविश्वास बघून जेव्हा ती sales करायची. डॉक्टर्स च्या नजरेला नजर देऊन अत्यंत आत्मविश्वासाने ती जेव्हा sales call करायची, तेव्हा कुणीही तिला prescription साठी नाही म्हणायचं नाही.
तिचा
करारीपणा आणि आत्मविश्वास तिचं मुळातले सौंदर्य अजून खुलवायचे. आणि खरं
सांगू, तिला propose वगैरे करायला पण कुणी धजायचा नाही कारण भल्या भल्या
पुरुषांना पण हि मुलगी न्यूनगंड द्यायची. एकदा माझ्या आईने तिला विचारले,
"काय गं, तू अशी सर्वत्र फिरतेस एकटी. तुला भीती वाटत नाही मुलगी म्हणून?"
तेव्हा आपल्या पर्स मध्ये ठेवलेला छोटा चाकू दाखवत बाईसाहेब बोलल्या,
"माझ्या अंगावर हात टाकणारा अजून जन्माला यायचाय काकू!" माझी आई बराच वेळ
सर्द दिसत होती त्यानंतर.
नोकरी व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना जसे वाईट अनुभव येतात किंवा नकोसे किळसवाणे प्रस्ताव अप्रत्यक्षपणे येतात तसे तिला पण यायचे. पण तिने कधी सहन केलं नाही आणि एकदा सरळ कंपनी बदलली पण तडजोड केली नाही. खुपदा शंका यायची कि हिला स्त्रीसुलभ भावना आहेत कि नाहीत. एके दिवशी भल्या सकाळी माझ्याकडे आली आणि डोळ्यात घळाघळा पाणी. घरच्यांनी तिला खूप टोचेल असं काही बोललं होतं जे तिला सहन नाही झालं. त्यादिवशी पहिल्यांदा मी तिला रडताना पाहिलं. तिच्या रडू बघून पण त्या दिवशी बरं वाटलं कारण तेव्हा कळलं कि या करारी, बाणेदार चेहऱ्यामागे पण एक प्रेमळ, गोड आणि संवेदनशील मुलगी आहे.
कालांतराने तिचं सर्वसंमतीने arrange marriage झालं. माझं पण मिरज सुटलं. संपर्क कमी होत गेला. शेवटची भेट होऊन पण 6 वर्ष झाली आता. पण आजपण घराची जबाबदारी घेऊन, पुरुषांच्या खांद्याला खांदा आणि नजरेला नजर देऊन सामोरी जाणारी एखादी स्त्री, महिला सहकारी पहिली कि या आर्चिची आठवण नक्की येते.
- फेसबुक पोस्ट ( ३ मे २०१६, २३.२२ )

No comments:
Post a Comment