परवा एका मित्राच्या कुटुंबाने पहिला विमानप्रवास केल्याचे फोटो फेसबुक
वर पाहिले, देशांतर्गत प्रवास असला तरी त्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर
नाविन्याचा आनंद ओसंडून वाहत होता. कॉर्पोरेट जगात राहून विमानप्रवास किंवा
पंचतारांकीत हॉटेल मधलं वास्तव्य यांचं कौतुक वाटण्यापेक्षा आता कंटाळा
यायला लागलाय.
जो आनंद पहिल्या अनुभवात आहे तो दुसऱ्यात नाही. 'Law of diminishing returns' अर्थशास्रापेक्षाही अनुभवविश्वात जास्त लागू पडतो. Bluff-master मध्ये बोमन इराणी अभिषेक बच्चन ला आयुष्यातल्या पहिल्या अनुभवांचे एक सुंदर वर्णन आणि महत्व सांगतो. तेव्हा lifestyle टिकवण्यापेक्षा नाविन्य बघा, जे केलं नाही ते करून बघा (कुणाला दुःख न देता) भले ती कितीही छोटी आणि साधी गोष्ट असू द्या. पुन्हा प्रेमात पडा, नवे मित्र जोडा, नवीन लेखक वाचा, उनाड भटकून घ्या, स्टेटस आणि hygiene च्या नावाखाली 5 स्टार मधील बेचव खाणे सोडून कधी street food वर आडवा हात मारून बघा.
बाबू मोशाय, जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नही!
इब्न-ए-बतूत कडून आजचं प्रभात प्रवचन एवढंच
- फेसबुक पोस्ट ( ५ मे २०१६, ०५.०९ )

No comments:
Post a Comment