Wednesday, December 28, 2016

अंगुरलता

पुरुषाने 'शराब आणि शबाब' चा शौक ठेवला कि त्याला 'जिंदादिली' म्हणायचं. आणि बाईने (योगायोगाने समर्पक नाव 'अंगुरलता' अर्थात द्राक्षाचा वेल) तेच केले की त्याला 'चरित्रहीनता' म्हणायचं. याला दुतोंडीपणा आणि बौद्धिक दिवाळखोरी म्हणतात दुसरे काही नाही.

भाजपवाल्यांनी आसाम मधील हे मोठं मन बाकीच्या भारतात पण दाखवून आपल्या बगलबच्चे कट्टर हिंदुत्ववादी संघटना विसर्जित कराव्यात. काँग्रेसवाल्यांनी थोडी लाज वाटून वैयक्तिक मुद्दे सोडून भाजपच्या ढिसाळ राज्यकारभारावर विधायक टीका करावी.

सरकारे चालवा, विरोधी पक्षाच्या घटनादत्त भूमिका पार पाडा. कुणी काय खावं, काय प्यावं, काय घालावं, कुणाशी लग्न करावं हे शिकवायला राजकीय पक्ष बनवत नसतात.

- फेसबुक पोस्ट ( २३ मे २०१६, ०९.०९ )

No comments:

Post a Comment