निळू फुलेँवर आजकाल Whatsapp वर येणारे विनोद वाचले कि आपण real life मधल्या सज्जन माणसाला पण त्याच्या reel life वरून कस stereotype केलं हे सहज कळतं. वास्तविक एक स्वातंत्र्यसेनानी, सेवा दलाचा कार्यकर्ता आणि आणि सत्यशोधकी विचारांचा हा विनम्र नटसम्राट खूप दिलखुलास आणि मिश्किल पण होता.
साल 1975, माझे वडील विटा (सांगली जिल्हा) येथे FYBA करत होते. गणपती उत्सवाच्या काळात एका नाटकासाठी निळू फुले तिथे आले होते. ST स्टँड समोरच्या एकमेव 'अंबिका लॉज' वर ते वस्तीला होते. सगळ्या मुलांप्रमाणे माझ्या वडिलांना पण वाटलं कि बघून तरी येऊया कसे दिसतात निळू फुले ते. संध्याकाळची वेळ, वडिलांनी निळूभाऊंच्या रूमचा दरवाजा ठोठावला. दार उघडलं गेलं तर साक्षात निळू फुले समोर उभे आणि त्यांच्या धीरगंभीर आवाजात बोलले "बोला". माझे वडील चाचपडत बोलले,"काही नाही, तुम्हाला पाहायला आलो होतो." त्यावर वैतागून निळूभाऊ बोलले, "घ्या घ्या, बघून घ्या, काही शिंगं-शेपूट आलय का मला ते! वैताग आणलाय लोकांनी!" आणि दार पुन्हा बंद झालं.
2002 सालच्या सुमारास पंढरपूर शेजारच्या एका खेडे गावात एका शाळेच्या
उदघाटन समारंभाला निळूभाऊ आले होते. खेड्यातल्या पद्धतीनुसार स्टेजच्या
समोर सगळी पुरुषमंडळी बसली होती आणि बायका जरा दूर अंतरावर मागे बसल्या
होत्या. निळूभाऊंनी माईक हातात घेतला आणि बोलू लागले, "आमच्या माता-भगिनी
जरा जास्तच दूर बसलेल्या दिसतायत. त्यांचा दोष पण नाहीये म्हणा, आम्ही जे
शे-दीडशे सिनेमात दिवे लावलेत त्यामुळे त्या दूर बसल्यात. अहो ते सिनेमात
करतो ते खोट असतं हो, तेव्हा घाबरू नका. पुढे येऊन बसा."
खलनायकाच्या भूमिका करणाऱ्या नटाला खऱ्या आयुष्यात पण लोकांच्या अकारण भीती किंवा तिरस्काराला सामोरं जावे लागणे हि त्या नटाच्या अभिनयाला मिळालेली पोचपावती असते. Stereotyping असले तरी आणि वाडे इतिहासजमा झाले तरी मराठी माणूस "बाई वाड्यावर या" या वाक्यातून निळूभाऊंना नेहमी आठवणीत ठेवेल.
- फेसबुक पोस्ट (२९ एप्रिल २०१६, २०.१९ )
खलनायकाच्या भूमिका करणाऱ्या नटाला खऱ्या आयुष्यात पण लोकांच्या अकारण भीती किंवा तिरस्काराला सामोरं जावे लागणे हि त्या नटाच्या अभिनयाला मिळालेली पोचपावती असते. Stereotyping असले तरी आणि वाडे इतिहासजमा झाले तरी मराठी माणूस "बाई वाड्यावर या" या वाक्यातून निळूभाऊंना नेहमी आठवणीत ठेवेल.
- फेसबुक पोस्ट (२९ एप्रिल २०१६, २०.१९ )
No comments:
Post a Comment