हा नागराज पण ना अजब माणूस आहे. डुकरे धरणाऱ्या पोराचं अजाणत्या वयातील प्रेम दाखवायला कुणी सिनेमाचे रीळ वाया घालवते का? पण तो बिनधास्त करतो असा सिनेमा आणि त्याला आंतरराष्ट्रीय पुरस्कार पण मिळतात. काही तरी लोचा आहे या नागराज च्या आणि त्या समीक्षकांच्या डोक्यात! बरं मी म्हणतो एकदा चुकला असेल, पण हा पुन्हा एक असलीच लव्हस्टोरी घेऊन हजर! का रे बाबा, तुला फक्त गरीब-दलित नायक आणि उच्चवर्णीय श्रीमंत नायिका हे एकच सूत्र माहित आहे का?
आणि समजा नागराजा तुला तेवढं एकच सूत्र माहित असले तरी त्याच सूत्रातला गेल्या 100 वर्षातला, त्या गरीब नायकाला हाकलून लावतात, मग तो शिकून, धंदा करून श्रीमंत होतो, मुलीच्या बापाला जीवघेण्या संकटातून वाचवतो आणि मग त्यांचं लग्न होतं हा पॅटर्न काय वाईट आहे का??? काय तर तुझे नायक आणि नायिका!! दगड काय मारतात, गोळी काय झाडतात! संस्कार नावाची गोष्ट म्हणून ठेवली नाहीस तू मुलांना शिकवायला. कसं काय असला उपद्रवीपणा सुचतो रे बाबा तुला?
हे नागराजा, तु कमी शिकलेला आहेस, त्यातून अजून अडाणी दलित समाजातला, म्हणून समजावून सांगतोय तुला ते नीट ऐक.
1. आसिंधू-सिंधू हिंदू बांधव एक आहे. आमच्यात कसलेही भेदभाव नाहीयेत कळलं!!! तेव्हा तुझ्या असल्या फुटकळ सिनेमाने आमच्या शांत आणि बंधुभावाने भारलेल्या 'अखंड हिंदू' समाजात विष कालवू नकोस. कुठं फेडशील हे पाप???
2. त्यातून पण आम्ही फुले-शाहू-आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्र राज्यात राहतो. आम्ही जाती-पातींची जुलमी बंधने केव्हाच टाकून दिलीयत. कित्येक लोकांना आमच्या इथे प्रश्न पडतो कि आमची जात कुठली कारण आई, बाप, आजी, आजोबा, आत्या, काका सगळे वेगवेगळ्या जातींचे. आंतरजातीय विवाहाच्या जाहिरातीत "SC-ST क्षमस्व" असली मागासलेल्या UP-बिहारी लोकांसारखी ओळ आम्ही टाकत नाही. मग कशाला अशा एकसंध समाजात तू फूट पाडतोय??
3. अशा महन्मंगल समाजात तू लोकांना दगड मारावेत, गोळ्या माराव्यात तुझ्या नायक-नायिकांकरवी!! अरे नतद्रष्ट माणसा, हिंसा आम्ही स्वप्नात पण करत नाही (कोण बोलतंय रे ते खैरलांजी आणि नितीन आगे चं नाव घेऊन?), आणि तू चक्क शिव्या आणि हिंसेची संस्कृती आमच्या कोवळ्या मुलांना देतोय? काही संस्कार आहेत कि नाहीत तुला??
4. मुळात आमच्याकडे सर्व मुले-मुली स्वतःच्या इच्छेने लग्न करतात कुणाची जात किंवा धर्म न पाहता. आणि आम्ही घरचे पण दोन्ही बाजूचे लोक मिळून थाटामाटात लग्न लावून देतो अशा प्रेमी युगुलांचं (कोण आहे रे तो कोल्हापूरच्या कुलकर्णीच नाव घेतोय? जरा बघा त्याला!). महाराष्ट्रा मधले एकेक गाव साक्ष आहे अशा आंतरजातीय (जात काय असते हो हि?) आणि आंतरधर्मीय लग्नाचे! मग कशाला कोण जब्या दगड मारील आणि कुठली आर्चि पिस्तुलातून गोळी झाडेल??
तर नागराज, तू तुझा हा असला विखारी, प्रतिगामी, कट्टरपंथी आणि जातीयवादी सिनेमा घेऊन या पुरोगामी महाराष्ट्रामधून चालता हो! नाहीतर आम्हाला तुला 'मॉर्निंग वॉक' ला जायचा सल्ला द्यावा लागेल !
- फेसबुक पोस्ट (२८ एप्रिल २०१६, २१.३७ )

No comments:
Post a Comment