Wednesday, December 28, 2016

महामानव बुद्ध


सत्ता-संपत्ती, सौंदर्य, सारे भोग पायाशी लोळण घेत असताना पण आयुष्याबद्दलच्या मूलभूत प्रश्नांनी अंतर्मुख होणारा एक विचारी राजपुत्र.
  • नदीच्या पाण्यावरून दोन राज्यात होणारा कलह शांतीच्या मार्गाने सोडवावा म्हणून गृहत्यागास तयार होणारा एक शांतिदूत.
  • अंगुलीमाल सारख्या दरोडेखोराच मनपरिवर्तन करून त्याला नवं आयुष्य देणारा एक करूणासागर.
  • देशोदेशींच्या विद्वानांना विवादात तर्काने हरवून त्यांना आपले शिष्यत्व देणारा एक प्रकांडपंडित.
  • देव-धर्म, स्वर्ग-नरक, वर्णव्यवस्था, कर्मकांड नाकारून माणसाला स्वतंत्र करणारा एक समाज-क्रांतिकारक.
  • चार आर्यसत्ये, अष्टांग मार्ग जगाला देऊन त्यानुरूप वर्तन करत निर्वाणास प्राप्त झालेला एक बोधिसत्व.
  • 'अप्प दीप भव' म्हणत प्रत्येक माणसाला स्वतःच्या आतलं बुध्दत्व शोधायला लावणारा एक महान तत्त्ववेत्ता.
कुणी त्यांना भगवान केलं, कुणी त्यांना अवतार केलं तर कुणी त्यांच्या धम्माला धर्मात बांधून या महामानवाला विहारात कोंडून पण टाकलं. मला मात्र हा माणूस मानवी अस्तित्वाची सर्वांना शक्य अशी, सर्वात वरची परिपूर्ण अवस्था वाटतो. या महामानवाच्या 1% जरी ज्ञान ग्रहण करून त्यानुरूप सम्यक कर्म करू शकलो तरी हा जन्म धन्य मानेन.

- फेसबुक पोस्ट ( २१ मे २०१६, २०.१० )

No comments:

Post a Comment