2009 साली दसऱ्याच्या दिवशी मी आणि वडील स्वातीला पाहण्यासाठी गेलो. तशी ती दूरची नातेवाईकच, पण आम्ही कधी भेटलो नव्हतो त्याआधी. स्वातीच्या एकत्र कुटंबाशी ओळखी करून झाल्यावर थोड्या वेळाने स्वाती आली. एरव्ही कुठल्याही मुलीला बेधडक बोलणारा मी सुरुवातीला शांत होतो. वडिलांनी स्वातीला नाव, शिक्षण असे जुजबी प्रश्न विचारून झाले. मी माझ्या सोबत आलेल्या मामाला कानात सांगितलं कि मला मुलीला एकांतात काही बोलायचंय. त्याने स्वातीच्या वडिलांना ते बोलून दाखवले. छोट्याशा खेड्यात हा प्रकार जरा नवीन होता, तरीही स्वातीचे वडील तयार झाले आणि आम्ही दोघे शेजारच्या एका खोलीत गेलो.
साधारणतः पहिल्या भेटीत लोक एकमेकांवर छाप पाडण्यासाठी चांगलं सांगतात. पण
मी सुरुवात केली ती माझ्या गडद पूर्वेतिहासापासून जो तिला अगदी ओझरता
ऐकायला मिळाला होता, तोही अगदी आदल्या दिवशी. स्वतःच्या आयुष्यातील साऱ्या
अप्रिय घटना सांगून मी स्वातीला बोललो, "मी असा आहे. 2 महिन्यांपूर्वी जे
माझ्या मोठ्या पगाराचे वर्णन तू ऐकलेय ते आता गैरलागू आहे कारण मी ती नोकरी
सोडलीय. मी डॉक्टर असलो तरी लग्नानंतरची काही वर्षे तुला चारचाकी गाडी,
मुबलक पैसा, हौस-मौज अशा गोष्टी मी देऊ शकणार नाही. तुला पटत असेल तर हो
म्हण. तुझा नकार असेल तरी माझ्या तुला शुभेच्छा आहेत." स्वाती त्या 20-25
मिनिटांत मुश्किलीने 3-4 शब्द बोलली असेल.
स्वातीच्या घरातून बाहेर पडताना वडील मला म्हणाले, "विनय, आपल्याला अशीच मुलगी हवीय." माझे आणि स्वातीचे संभाषण फक्त मलाच माहित होते आणि त्यावरून मला स्वाती हो म्हणेल याची खूपच पुसट अपेक्षा होती मला, कारण स्वातीसाठी त्यावेळेस माझ्या पेक्षा चांगल्या नोकरीवर असणाऱ्या मुलांची स्थळे आधीच तिच्या होकाराच्या प्रतीक्षेत होती. वडिलांच्या वाक्यावर मी मौन बाळगणेच पसंत केले. दुसऱ्या दिवशी स्वातीच्या घरच्यांशी वडिलांचे फोन वर बोलणे झाले. स्वातीने माझा भूतकाळ विसरून आणि भविष्य माहित नसताना पण मला चक्क होकार दिला होता. खूप मोठी जोखीम घेतली होती तिने अगदी लहान वयात.
आज आयुष्यात जे काही चांगले दिवस मी पाहतोय त्यात सर्वात जास्त कुणाचे कष्ट आणि त्याग असतील तर ते स्वातीचे. बऱ्याच वर्षांनी आयुष्य सुरळीत झाल्यावर तिला विचारलं कि काय बघून तू मला हो म्हणालीस. त्यावर ती म्हणाली, "तुमचा खरेपणा आणि प्रामाणिकपणा." तेव्हाही आणि आजही माझं आयुष्य हे खुली किताब आहे स्वातीसाठी, कसलंही गुपित नाही. आयुष्यात सुहृदांपासून गोष्टी लपवण्यापेक्षा त्यांच्याजवळ त्या प्रामाणिकपणे व्यक्त करण्यात, ती पारदर्शकता ठेवण्यात जास्त हाशिल आहे कारण माणूस कधीही परिपूर्ण नसतो.
- फेसबुक पोस्ट ( २१ मे २०१६, १२.३० )

No comments:
Post a Comment