Wednesday, December 28, 2016

दैवतीकरणाचे दुष्परिणाम


इंदिरा गांधी पंतप्रधान असतानाची गोष्ट. मीडिया (तात्कालिक मोजकी वृत्तपत्रे) खिशात होता आणि सगळीकडे त्यांची larger than life अशी प्रतिमा बनवली गेली होती अगदी जणू काही त्या alien आहेत. थोडक्यात आजच्यासारखेच म्हणा ना!

इंदिराजी सोलापूर दौऱ्यावर येणार होत्या. जय्यत तयारी सुरु होती, हेलिपॅड पासून ते अगदी आधुनिक शौचालया पर्यंत आणि त्याची वर्णने पण वृत्तपत्रात येत होती. माझे आजोबा त्याकाळातले कट्टर काँग्रेसविरोधी राजकारणी. त्यांचा एक कार्यकर्ता हि सगळी रसभरीत वर्णने वाचून खूप भारावून गेला आणि खूप निष्पाप भाबडेपणाने आजोबांना विचारता झाला ,"कालेसाहेब, इंदिराजी शौचाला पण जातात?" आजोबा खऱ्या अर्थाने निरुत्तर झाले होते  

- फेसबुक पोस्ट (२३ एप्रिल २०१६, ०९. २७) 

No comments:

Post a Comment