"मला ना ______ मध्ये खूप interest आहे पण वेळच मिळत नाही !" हे वाक्य आपण सगळे जण सतत ऐकत किंवा बोलत असतो रिकाम्या जागीचा शब्द बदलून. पण आवड असली कि सवड मिळते याचे सुंदर उदाहरण म्हणजे डॉ. Hiren Shah सर आणि त्यांच्या पत्नी डॉ. नमिता. सर अहमदाबादचे नामांकित बालरोगतज्ञ आणि मॅडम स्त्रीरोगतज्ञ. आणि या दांम्पत्याच्या घराचं नाव 'Houseum' जे बनलंय House + Museum पासून. घरात शिरल्यावर तुम्हाला थोडा वेळ पटणारच नाही कि तुम्ही एका राहत्या घरात आलाय.
सरांकडे सुमारे 2500 हुन अधिक वेगवेगळ्या प्रकारची कुलुपे आहेत, cryptic locks जी उघडायला कधी कधी चावी पण नसते आणि कुणी बळजबरीने उघडायला गेला तर काही वेळा इजा पण होऊ शकते. Houseum हा 2 मजली बंगला locks, clocks आणि peacocks या theme वर आहे. फक्त कुलुपेच नाही तर अगदी जगभरातील वेगवेगळी प्रकारची घड्याळे आणि मोराच्या प्रतिकृती घरभर पाहायला मिळतील. एवढेच नाही तर तुम्हाला हुसेन, रझा सारख्या नामांकित पेंटर्स ची पेंटिंग्स पण पाहायला मिळतील. गणेशाच्या असंख्य मूर्ती, पुरातन शिल्पे, ऐतिहासिक वाड्यांच्या कोरीव लाकडी कमानी, दरवाजे Houseum मध्ये वापरात आहेत. आणि या सगळ्यांचे collector, curator आणि guide स्वतः शाह दांपत्य.
बरं हिरेन शाह हा अवलिया इथेच थांबत नाही. Puzzles च्या दुनियेत ते
आंतरराष्ट्रीय तज्ञ आहेत आणि दरवर्षी ते स्वतः कित्येक puzzle तयार करतात
आणि international conference मध्ये जाऊन सादर पण करतात. हा अवलिया संबंध
जगभर प्रवास करतो आणि ते पण सहकुटुंब. ते जितके चांगले डॉक्टर आहेत तेवढेच
चांगले photographer. Theme based फोटोग्राफी पासून ते travel आणि wild
life photography पर्यंत त्यांचा हातखंडा आहे. आणि त्यांचे कित्येक
photographs वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये, advertisement मध्ये नावाजले आणि
वापरले गेलेत.
आणि ह्या सगळ्या इतकेच छान यजमान आहेत शाह दांपत्य जेव्हा तुम्ही त्यांचे पाहुणे असता. अहमदाबाद मध्ये असताना season चा पहिला आमरस मी त्यांच्याचकडे खाल्लाय आणि माझ्या सोबत माझ्या IIM मधल्या कित्येक मित्रांचे स्वागत तेवढ्याच प्रेमाने केलेय त्यांनी. मिरज मेडिकल मधूनच शिकलेले डॉ.हिरेन हे माझे गुरुबंधू आणि वयाने वडीलांसारखे असले तरी अगदी जिवलग मित्र!
अहमदाबादला स्थायिक होऊन पण मिरजेच्या-मुंबईच्या आठवणीत गुंग होऊन जाणारे असे हे अवलिया सुंदर मराठी दांपत्य आणि माझे अहमदाबाद मधले हक्काचे घर Houseum!
http://m.indiatoday.in/story/doc-locks/1/116151.htmlJ
- फेसबुक पोस्ट (२३ एप्रिल २०१६, ०३. ४३)

No comments:
Post a Comment