Wednesday, December 28, 2016

स्वाती

कबीरचे नवीन दात येताना सळसळतात, मग दिसेल ती गोष्ट तो चावतो. सोड म्हणून सांगितलं तरी सोडत नाही. अशा वेळेस स्वाती त्याला म्हणते, "जॉनी जॉनी.." कबीर अभावितपणे "हाहाहा" म्हणत तोंड उघडतो आणि स्वाती त्याच्या तोंडातली वस्तू सोडवून घेते.
Image may contain: one or more people

दीड वर्षाच्या मुलाकडून पण हवं ते करून घेण्याची सिद्धी आणि सहनशीलता फक्त आयांकडेच असते, बाप फक्त हतबल होऊन पाहतात किंवा रागाला जातात.

- फेसबुक पोस्ट ( २० मे २०१६, २१.०५ )

No comments:

Post a Comment