आज स्वातीने सहज विचारले, "कधी चिठ्ठी लिहिली होतीस का कुठल्या मुलीला?" भूतकाळ एकदम सिनेमाच्या रीळासारखा नाचत गेला डोळ्यासमोरून.
आयुष्यात 15 व्या वर्षी एकीने घेतलेला किस, मग दुसरीवर झालेलं अव्यक्त पण अपार प्रेम आणि नंतर तिसरीने केलेलं प्रपोज असल्या काहीतरी उलट क्रमात घडलेल्या घटना. समान धागा एकच, सगळ्या मुली वयाने मोठया होत्या. कारण तेव्हा लहान मुली जरा बालिश वाटायच्या आणि मोठ्या मुली जरा समजूतदार. हा समज स्वातीने मोडून काढला कारण आमच्या दोघांत मोठा मी असलो तरी समजूतदारपणा चं department तिच्याकडे आहे. त्यामुळे घरात 19 महिन्यांचा कबीर आणि त्यापेक्षाही लहान मी अशी दोन बाळे ती सांभाळत असते.
तर स्वातीच्या प्रश्नाचं उत्तर हे कि, हो लिहिल्या काही चिठ्ठया, पण
मित्रांसाठी. 'वेलकम टू सज्जनपुर' मधल्या महादेव कुशवाहा सारखे भाषेवर त्या
त्या वयात प्रभुत्व असल्याने आणि असंख्य कविता तोंडपाठ असल्याने हा पामर
आपल्या मित्रांना प्रेमपत्रे लिहून द्यायचा. दुसऱ्याच्या प्रेयसीला,
दुसऱ्याच्या वतीने प्रेमपत्र लिहिणे हा अत्यंत अवघड प्रकार आहे. खूप जास्त
तिच्या सौंदर्यावर लिहावं तर वाटावं कि आपणच लाईन मारतोय कि काय? खूप वरवर
लिहावं तर मग अपेक्षित परिणाम नाही. विरक्त राहून आसक्तीची भाषा वापरणे हा
कर्मयोग खूप लहान वयात साध्य केला मी.
आता राहिला स्वतःसाठी चा भाग. तर प्रेम व्यक्त करण्याच्या बाबतीत मी मलाच अगम्य आहे. आयुष्यात जिच्यावर पहिले प्रेम 14 व्या वर्षी झाले, तिला मी वयाच्या 30 व्या वर्षी सांगितले कि तू माझं पाहिलं प्रेम होतीस. तर कधी लग्नानंतर पण एखाद्या मुली वर मन गेले तर स्वातीला प्रामाणिकपणे केलेलं कथन आणि कन्फेशन. शेवटी तीच जिवाभावाची मैत्रीण, प्रेयसी, बायको आणि तात्यासाहेब शिरवाडकरांनी म्हणल्यासारखं या वढाय जहाजाच हक्काचं बंदर.
माणूस नशीबवान तेव्हा असतो जेव्हा त्याच्या गुणदोषांसकट त्याला पूर्णपणे स्विकारत कुणी त्याच्यावर जीवापाड प्रेम करत. आणि अनुभवाने सांगतो, एवढं विशाल मन आणि ती समज फक्त बायकांकडेच असते. या बाबतीत मी तरी अत्यंत नशीबवान आहे कारण माझं उत्तर ऐकून पण नेहमीच्याच सहजतेने हसून, स्वातीने माझ्या भूतकाळाला मागे टाकून, कबीरला पुढचा घास भरवायला घेतला होता. मला कदाचित हि सिद्धी प्राप्त करायला थोडी वर्ष जावी लागतील.
- फेसबुक पोस्ट ( ८ मे २०१६, ००.०० )

No comments:
Post a Comment