सैराट मध्ये सारखं "तुला मराठी समजत नसलं तर इंग्लिश मधी सांगू का!" असं सारखं बोलणाऱ्या आर्चि ला इंग्लिश खूप जबरदस्त येत असं जर तुम्हाला वाटलं असेल तर तुम्ही खालील 4 पैकी एका प्रकारात नक्की बसता !
1. काँग्रेस 'गरिबी हटाव' करेल यात तुमचा आतापर्यंतची 40 वर्षे विश्वास होता आणि अजून 50 वर्षे तो विश्वास अटळ राहील.
2. अण्णा हजारे हे नवे महात्मा गांधी आहेत यावर विश्वास ठेवून घरात बसून 'जंतर मंतर' चे नाटक बघून तुम्ही उगीच तंतरत होता.
3. 'अच्छे दिन आयेंगे' म्हणून तुम्ही घराला सोन्याची कौले कुठे करून मिळतील याची चौकशी पण गाडगीळ, तनिष्क किंवा मोठया सराफांकडे जाऊन गुपचूप करून आलात.
4. बाल कन्हैया आता नवी आजादी देणार आहे म्हणून तुम्ही बेभान होऊन नाचत होतात.
उत्तरे:
वरील 4 पैकी फक्त एकाच पर्यायाला 'हो' असे उत्तर असेल तर तुम्ही एक सामान्य आशावादी पण कट्टर माणूस आहात. तुमच्या आयुष्यात दुःख अटळ आहे.
2 किंवा 3 पर्यायांना तुम्ही 'हो' असे उत्तर दिले असेल तर तुम्ही गोंधळलेले प्रचंड आशावादी आहात. आणि तुमची अवस्था तशीच 'राष्ट्रवादी' आहे.
वरील चारी पर्यायांना तुमचे पर्याय हो असे असेल, तर तुम्हाला आयुष्यात कशाचेच दुःख होणार नाही. तुमच्यासाठी नवे गांधी, मोदी, अण्णा, कन्हैया नेहमी पुरवले जातील.
चारही पर्याय हो करून, त्यावर अजून तुम्ही 2 किंवा अधिक वेगळ्या पक्षाच्या मोर्चात सहभागी झाला असाल तर 'पद्मभूषण' साठी नामांकन पाठवून देणे.
- इब्न-ए-बतूत चे दिल्ली मधून प्रभात प्रवचन
फेसबुक पोस्ट ( ६ मे २०१६, ०६.४२ )

No comments:
Post a Comment