एकाच शाळेच्या आणि खासगी शिकवणीच्या दोन वेगवेगळ्या शाखांमध्ये/बॅचेसमध्ये मी आणि ती शिकत होतो, अगदी रेल्वेच्या समांतर रुळांसारखे. ९ वीत असताना काही तांत्रिक कारणांमुळे शिकवणीत एका दिवसासाठी दोन्ही बॅचेस केल्या होत्या, तेव्हा मी तिला पहिल्यांदा पहिले, अन...
त्या सुंदर डोळ्यांनी आयुष्यात पहिल्यांदा बसल्या जागी माझी हृदयाची धडधड वाढवली. माझ्या आयुष्याच 'बालभारती' एकदम 'युवकभारती' झालं. १२ मुले आणि ६३ मुली असली जगावेगळी पटसंख्या असलेल्या वर्गात शिकल्यामुळे त्यादिवसापर्यंत मुलींशी फक्त भांडणे करणारा हा जीव पहिल्यांदा एका मुलीच्या प्रेमात पडला. ग्रामोफोनेची पिन अडकावी तसा तिच्याच विचारात अडकून पडला. मनाच्या डिस्क वर फक्त एकच गाणे वाजत होते, तिच्या प्रेमाचे.
पुढचे काही दिवस शाळा, पुस्तकांशी काडीमोड घेतला होता कारण तिला रोज
पाहायला कारण हवे होते काहीतरी. शिकवणीच्या सरांना सांगितले कि मी दुसऱ्या
बॅचमध्ये येतो शिकायला. मग घरापासून जवळची १.५ किमी दूरची बॅच सोडून, ४
किमी दूरच्या बॅचला रोज सायकलवरून जायला सुरुवात केली. अख्खा दिवस फक्त
शाळा सुटायची वाट पाहायचो, संध्याकाळच्या शिकवणीसाठी. शिकवणीत बसून सरांच
एकही वाक्य कानावर आणि मनावर न घेता सारं ध्यान तिच्याचकडे असायचं. ९वी
पासून १२वी पर्यंत शिकवणीला कधी गेलोच तर ते बहुदा तिच्याचसाठी. पुढील ३
वर्षे तिला रोज पाहायचो, पण कधीही प्रत्यक्षात बोललो नाही एकमेकांना.
१२ वी संपली, तिच्या आणि माझ्या वाटा कायमच्या वेगळ्या झाल्या. माझं अव्यक्त प्रेम तसंच माझ्या मनात राहिलं. फेसबुक वर २ वर्षापूर्वी ती भेटली, मेसेमधून गप्पा झाल्या. १२ वी संपून १४ वर्षे झाल्यानंतर, आम्हा दोघांचेही संसार सुरळीत आणि सुखात चालू असताना मी तिला एकदा सांगितले कि बाई तू माझं पहिलं प्रेम होतीस. मनावरचा दगड १७ वर्षांनी बाजूला झाला एकदाचा! अव्यक्त प्रेम आणि राग या दोन्ही गोष्टी मनावर खूप मोठं ओझं ठेवून असतात.
प्रत्येकाच्या आयुष्यातलं पहिलं प्रेम खरंच अवर्णनीय असते. त्या तारुण्यसुलभ भावना, तो अधिरपणा, त्या नजरा, त्या आठवणी, ती स्वप्ने शब्दांत अवर्णनीय असतात. ती फक्त जगायची असतात आणि आयुष्यभर जपून ठेवायची असतात वहीत ठेवलेल्या मोरपिसासारखी. वहीत ठेवून एका मोरपिसाची दोन मोरपिसे होत नाहीत, तसंच पहिलं प्रेमपण बऱ्याचदा आपल्यापुरतच राहतं. पण म्हणून काही त्या एकट्या मोरपिसाच सौंदर्य आणि महत्व कमी होत नाही.

देखनेवाले मुझे दर्द-ए-मुहब्बत की कसम,
मैंने इस दर्द में दुनिया को भुला रख है,
मुझसे मत पूछ मेरे इश्क में क्या रखा है !
मैंने इस दर्द में दुनिया को भुला रख है,
मुझसे मत पूछ मेरे इश्क में क्या रखा है !
- फेसबुक पोस्ट ( १८ मे २०१६, ०८.५१ )
No comments:
Post a Comment