Wednesday, December 28, 2016

देव, देस आणि धर्मापायी

शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती?
देव, देस आणि धर्मापायी प्राण घेतलं हाती !

देव - एक अशास्त्रीय आणि भ्रामक संकल्पना
देश - पृथ्वीचे मानवनिर्मित राजकीय तुकडे
धर्म - पोथीनिष्ठ, अचल आचारसंहिता


हे कळायला आयुष्याची बरीच वर्षे जावी लागली. आणि जेव्हा या तिन्ही भ्रामक संकल्पनांमधून मुक्त झालो तेव्हा लहानपणीचे हे आवडीचं गाणं अचानक तिरस्करणीय वाटायला लागलं.

माझं आयुष्य कुठल्याही भ्रामक समजुतीच्या रक्षणासाठी बलिदान करण्यास किंवा त्यासाठी दुसऱ्या माणसाचा अकारण बळी घेण्यास मी कधीही तयार होणार नाही. मला तो शुद्ध अतिरेकीपणा वाटतो.

- फेसबुक पोस्ट ( १९ मे २०१६, ११.२४ )

No comments:

Post a Comment