"नावात काय आहे?" हे वाक्य ऐकून ऐकून गुळगुळीत झालय पण ज्यांची
नावे उच्चारायला विचित्र किंवा अवघड आहे त्यांचे दु:ख बाकीच्यांना कळणार
नाही. विनय या माझ्या नावाचे इतके चुकीचे लेखी व तोंडी उल्लेख मी लहानपासून
भोगलेत कि सांगायची सोय नाही. विजय, विनायक पासून ते अगदी विनया पर्यंत!
सुदैवाने आडनाव सोपे होते त्यामुळे त्याचे सुख होते. पण सगळी सुखे सर्वकाळ
नसतात हे हि अनुभवायला मिळाले.
IIM Ahmedabad च्या पहिल्या वर्षाची एक बैठक व्यवस्था असते. पूर्ण वर्ष त्याच जागेवर बसायचे आणि तुमच्या डेस्कच्या समोर तुमची नावाची प्लेट पण असते जेणेकरून faculty ना तुम्हाला नावाने हाक मारता यावी. हि नावे तुमच्या board certificate वरून घेतलेली असतात आणि म्हणून SSC बोर्डाच्या कृपेने माझ्या नावाची प्लेट 'Kate Vinay' अशी आली होती.
Operations Management चा पहिला तास. प्रो.सोमण वर्गात आले. सर्व वर्गाकडे एक नजर फिरवून बोलू लागले, "आज वर्गात येण्याआधी मी सगळी नावे वाचून पहिली विद्यार्थ्याची. त्यात 'केट' हे नाव वाचून खूप बरे वाटले कि कुणी सुंदर मुलगी असेल आणि येवून पाहतोय तर इथे हा बसलाय!" पुढील २ मिनिटे अख्खा वर्ग हशात बुडून गेला होता. त्यानंतर अजून पण IIM मधले कित्येक मित्र-मैत्रिणी मला 'केट' म्हणून हाक मारतात आणि मी माझ्या आडनावाची Titanic बुडवणाऱ्या Kate Winslet ला हसून मनात धन्यवाद देतो
- फेसबुक पोस्ट (२२ एप्रिल २०१६, १९. ३७)

No comments:
Post a Comment