माझे वडील ज्या कॉलेजला प्राध्यापक होते तिथे 'बापू' शिपाई म्हणून काम करत होते. अत्यंत सुंदर, नीटनेटका, प्रेमळ आणि सदाचारी माणूस त्यामुळे आमचे घरगुती संबंध. पुस्तकांवर त्यांचे प्रचंड प्रेम म्हणून ते कॉलेज मध्ये लायब्ररी मध्ये अगदी स्वत:हुन ड्युटी मागून काम करत. शिवाय स्वतःच्या मुलांना पण चांगली पुस्तके लायब्ररी मधून नेता येतील ही एक दृष्टी. पुस्तके स्वच्छ, नेटकी ठेवावीत हा त्यांचा शिरस्ता आणि ते अगदी जुन्यापुराण्या पुस्तकाचे बाईंडिंग आणि कव्हर करून त्याला अगदी नवं रूप देत. माझी पुस्तके बाईंडिंग करताना ते मला म्हणत,"विनय, तू मेडिकल ला गेलास की मी तुला सोन्याचा पेन घेऊन देईन". स्वतःच्या खिशाला 10 रुपयांचा Airmail चा शाईपेन लावणारा हा माणूस CEO किंवा कोट्यधीश नव्हता तेव्हा, पण खूप सुंदर आणि मोठी स्वप्ने पाहायचा आणि लोकांना पण द्यायचा.
बापूनां 2 मुले आणि 1 मुलगी, माझ्याच वयाची आणि तिन्ही हुशार. मुलांच्या
शिक्षणासाठी बापूनी वडिलोपार्जित जमीन सुद्धा विकली. मोठा मुलगा मेरिटने
मेडिकल ला गेला तेव्हा धाकटा 10 वीच्या आसपास, शिपाई माणसाचा पगार असा
कितीसा पुरणार! पण बापू हरले नाहीत, कोंड्याचा मांडा करून या माणसाने संसार
केला आणि मुलांची शिक्षण ही सर्वोच्च प्राथमिकता ठेवली. मुले पण
बापूंसारखीच सद्गुणी, त्यांनी सुद्धा कधीही कसला बाऊ न करता, शिक्षण हा
एकमेव मंत्र अंगीकारला आणि पाहता पाहता बापूंची तिन्ही मुले मेरिट मध्ये
डॉक्टर्स झाली, MD झाली.
पंढरपूर कॉलेज मध्ये प्राचार्याचा मुलगा clerk च्या जागी भरती होताना आम्ही पहिला. आणि कित्येक प्राध्यापकांची मुले पूर्ण वाया गेलेली पण आम्ही पहिली. घरात एक डॉक्टर झाला तर लोकांना आकाश ठेंगणे व्हायचे आणि इथे बापूंनी तिन्ही मुले डॉक्टर केली आणि ती पण मेरिट ने. लोकांना हेवा वाटावा इतकी हि उपलब्धी आली होती बापूंच्या सदाचारातून, त्यांच्या पुस्तकांच्या प्रति प्रेमातुन आणि सुंदर स्वप्ने पाहून त्यासाठी सर्व त्याग करायच्या तयारीतून.
बापूंनी मला सोन्याचा पेन दिला नाही, पण सोन्यासारखी स्वप्ने दिली. आणि आजही बापूंनी शिकवलेल्या पद्धतीने पुस्तकाचे बाईंडिंग करायला घेतो किंवा कव्हर घालतो तेव्हा या सुंदर माणसाची आठवण प्रकर्षाने येते.
पुस्तके काय करू शकतात हे आजच्या 'पुस्तक दिनी' सांगायला मला बापूंसारखे हक्काचे उदाहरण नाही!
- फेसबुक पोस्ट (२३ एप्रिल २०१६, २०.४१)

No comments:
Post a Comment