चौथीत जातानाच शाळेत स्कॉलरशिपच्या परीक्षेचे वारे जोरात वाहू लागले. माझ्यासह सगळ्या हुशार (?) विद्यार्थ्यांना सरसकट त्यासाठी शाळेने मैदानात उतरवले. 11.30 ला भरणारी शाळा आम्हा काही लोकांसाठी 10 ची झाली. एक आठवड्यातच मी त्या अधिकच्या तयारीला वैतागून त्या परिक्षेशी काडीमोड घेतला. परिक्षेसाठीचे सारे पुस्तक घरी स्वतः सहज सोडवले पण फॉर्म भरला नाही.
एक कागदी सर्टिफिकेट, दुसऱ्या दिवशी रद्दीत जाणाऱ्या वर्तमानपत्रात येणाऱ्या बातमीतले एक नाव, शाळेतला एक कौतुक सोहळा आणि शे-दीडशे रुपयांची रक्कम या बदल्यात स्वतःला वर्षभर घाण्याला जुंपून न घ्यायचा निर्णय घ्यायची क्षमता मला वयाच्या 9 व्या वर्षीच आली होती. त्यानंतर 7वी मध्ये पण स्कॉलरशिप, नंतर ते MTS, NTS सारखे प्रकार यांना मी ढुंकून पण पाहिले नाही.
कुणाला काही
सिद्ध करून दाखवण्यासाठी मी काहीही करत नाही. मला जे आवडते ते मी करतो, मग
भले ते कुणाला आवडो, वा नावडो. माझ्या मानेवर मी अजून तरी जू घेतले नाहीये
आणि कधी घेणार पण नाही. ही माझी 'स्कॉलरशिप' आहे आयुष्याने अनुभवातून
दिलेली !
- फेसबुक पोस्ट ( १५ मे २०१६, १३.५५ )
- फेसबुक पोस्ट ( १५ मे २०१६, १३.५५ )
No comments:
Post a Comment