मिरज मेडिकल मध्ये असताना साधारण 2003-04 ची गोष्ट. लातूरच्या ग्रामीण भागातून आलेला, कमी शिकलेल्या आई वडिलांच्या पोटी जन्मलेला पण हुशार असा एक माझा वर्गमित्र होता. त्याला लहानपणी गंडमाळ (lymph node swelling) झाल्यामुळे त्याचा घरच्यांनी अज्ञानामुळे वैदू कडून उपचार करुन घेतलेले ज्याने त्याच्या गळ्यावर दोन्ही बाजूला डागण्या दिलेल्या होत्या. त्याचे काळे व्रण शरीरासोबत वाढून बरेच मोठे आणि नकोसे दिसत. मुले पण चिडवायची त्याला आणि तो सुद्धा मग वाईट वाटून घ्यायचा.
एके दिवशी त्याने मला सांगितले कि मला हे व्रण घालवायचे आहेत प्लास्टिक सर्जरीने. मी त्याला घेऊन डॉ. अविनाश पाटील सरांकडे गेलो कारण त्यांचे प्लास्टिक सर्जरी मधले कौशल्य आणि नाव वादातीत आहे. एका कामगाराचा मनगटा पासून पूर्ण तुटलेला हात सरांनी 18-20 तासाच्या अथक सर्जरीने जोडून त्याला अगदी बोटांची हालचाल करून दाखवायला लावली होती काही दिवसात. दुभंगलेल्या टाळूची असंख्य ऑपरेशन सरांनी केली आणि कित्येक बाळांना नवीन आयुष्य दिले. तर अशा या जगविख्यात सर्जनकडे, जे आमचे गुरू सुद्धा होते, मित्र आणि मी गेलो.
सरांनी मित्राच्या गळ्यावरचे व्रण पाहिले आणि सर बोलले ," बाळ, हे व्रण
आपण सहज घालवू शकू अगदी छोट्या procedure ने. पण मला तुला काही सांगायचंय.
तुला ह्रितिक रोशन आवडतो? त्याला बघ 6 बोटे आहेत एका हाताला आणि त्याच्या
पहिल्या सिनेमात तो ते 6वे बोट थोडं लपवतोय. पण जेव्हा तो सुपरस्टार झाला
तेव्हा त्याने नंतर ते बोट लपवले नाही तर उलट 6 बोटं असणे हे style झालं.
तेव्हा आयुष्यात अस काही भव्यदिव्य कर कि तुझ्या गळ्यावरचे हे व्रण वाईट ना
दिसता एक style statement बनावं. इतकी कि लोकांनाही वाटावं आम्हला पण
गळ्यावर असे दोन व्रण असावेत!"
सरांच्या त्या बोलण्याने एक नवी ऊर्जा घेऊन मित्र आणि मी बाहेर पडलो. आता प्लास्टिक सर्जरीची गरज नव्हती राहिली. यथावकाश तो मित्र Navy मध्ये कॅप्टन म्हणून रुजू झाला आणि वैद्यकीय उच्चशिक्षण घेत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करतोय.
सरांचा surgeon's hand तर आम्हाला माहित होताच पण त्यांच सर्जनशील मन आणि विचार पण माझ्या मित्राचं आयुष्य बदलून गेले, scalpel शिवाय !
- फेसबुक पोस्ट (२१ एप्रिल २०१६, ०९.३७)

No comments:
Post a Comment