Wednesday, December 28, 2016

पं. नेहरू

या देशाला IIT, IIM सारख्या विज्ञानवादी आधुनिक शिक्षण संस्था दिल्या नेहरूंनी. पाकिस्तान सारखे धार्मिक कट्टरतावादी राष्ट्र न बनू देता शांतता आणि धर्मनिरपेक्षता दिली नेहरूंनी. काँग्रेसच्या विरोधी असणाऱ्या डॉ.आंबेडकरांसारख्या नेत्यांना पण महत्वाची मंत्रालये दिली नेहरूंनी. आंतरराष्ट्रीय राजकारणात 'एकला चलो रे' ची सावध भूमिका घेत एका नवजात देशाला मंडलीकत्वा पासून वाचवलं नेहरूंनी.

माणूस किंवा नेता म्हणून नेहरूंनी काही चुका पण केल्या असतील. पण एका नुकत्याच जन्मलेल्या धार्मिक, भौगोलिक, सांस्कृतिक वैविध्याने नटलेल्या अजस्त्र राष्ट्राला एकसंध ठेवून त्याच्या विकासाची पायाभरणी करायचं श्रेय निर्विवादपणे नेहरूंकडे जाते.

तुम्हाला आवडो किंवा पूर्वग्रहदूषित मनामुळे ना आवडो, पं. नेहरू हे भारताला लाभलेलं अत्यंत सुसंस्कृत, पुरोगामी, विज्ञानवादी आणि विकासकारक नेतृत्व आहे जसेे आपल्या एकाही शेजारी राष्ट्राला सुरुवातीच्या काळात मिळाले नाही. तुम्ही त्यांचं फक्त नाव क्रमिक पुस्तकातून मिटवून टाकाल पण त्यांच्या कार्याला, विचारांना आणि त्या पुरोगामी विचारधारणेला इतिहासातून मिटवू शकणार नाहीत.

- फेसबुक पोस्ट ( १२ मे २०१६, १८.०० )  

No comments:

Post a Comment