2009 साली मी UPSC परीक्षेचा एक प्रयत्न केला होता. त्या काळात पुण्यात 'यशदा' मध्ये मला राहुल भेटला. वडील डॉक्टर आणि आरोग्य खात्यात मोठे अधिकारी, मोठा भाऊ पण MD डॉक्टर अशा सुखवस्तू घरातला हा मुलगा, B.Sc करून UPSC ची तयारी करत होता. घरातल्या घरात तुलना केली तरी तो त्याच्या नातेवाईकांना जरा डावा वाटायचा त्याच्या वडील आणि भावाच्या तुलनेत. त्यात फक्त बीएस्सी वर शिक्षण थांबवून UPSC ची तयारी म्हणजे सगळ्यांच्या थट्टेचा विषय.

यशदा मध्ये आम्ही खूप घनिष्ठ मित्र झालो. रोज गप्पा मारताना त्याचा एक एक पैलू समोर यायला लागला. अगदीच Mumma's boy असा हा मुलगा होता. त्यात 5 वर्षापासून एका मुलीशी प्रेम पण करत होता पण हातात नोकरी किंवा पुरेसे शिक्षण नसल्याने ते प्रेम आईवडिलांना पण सांगितल नव्हतं त्याने. एकाच वेळेस असंख्य पातळीवर त्याचा संघर्ष चालू होता त्याचा. पण काहि गोष्टी त्याच्या तेव्हाही ठळक दिसायच्या त्या म्हणजे त्याचे स्वावलंबन (घरून पैसा न घेणे), त्याच सुंदर व्यक्तिमत्व, भाषेवरच प्रभुत्व आणि चिकाटी.

UPSC चा त्या वर्षीचा आमचा प्रयत्न निष्फळ झाला. दरम्यान मी IIM मध्ये गेलो. त्याची शिल्लक रक्कम जवळपास संपत आली होती तेव्हा त्याला काही अर्धवेळ काम हवं होतं. मी पुण्यात जिथे किरण जोशी सरांकडे CAT ची तयारी केली त्यांच्याशी मी राहुलची ओळख करून दिली आणि एक नवीन वळण आलं राहुलच्या आयुष्यात. सरांकडे रिसेप्शनिस्टच आणि इतर कामे राहुल करायला लागला. झेरॉक्स काढून आणणे, अकौंटिंग, विजेची बिल भरणे इथपासून ते अगदी मुलांना चहा आणून देणे हि कामे सुद्धा हा मुलगा हसतमुखाने करत होता. पगार फक्त 5000 रु. पण त्या पगारापेक्षा पण महत्वाची गोष्ट म्हणजे सरांकडे aptitude आणि interview साठीची तयारी त्याची व्हायला लागली होती. सोबत सरांकडे त्याला खूप सारे IIM च यशस्वीे आजी-माजी विद्यार्थी भेटत होते, जे त्याला एक वेगळं जग दाखवून त्याच्या स्वप्नांना शांत बसू देत नव्हते.

राहुलचा general studies मध्ये हातखंडा होता. जोशी सरांच्या शेजारीच एक UPSC चे नामांकित क्लासेस होते. तिथे राहुल clock hour basis वर शिकवायला लागला, रक्कम मोठी नव्हती पण confidence यायला लागला होता. दोन दोन अर्धवेळ नोकऱ्या सांभाळत तो शिकत होता. जेव्हा UPSC क्लासमध्ये त्याच नाव झालं तेव्हा तो त्या क्लास च्या pay roll वर गेला आणि 2 वर्षात अगदी आंशिक भागीदार पण बनला. जोशी सरांकडची नोकरी सुटली तरी अभ्यास तिथेच बसून सुरु होता आणि तो जिव्हाळा उलट वाढत होता.

UPSC कोचिंग मध्ये छान बस्तान बसल्यावर राहुलने जेव्हा पुरेशी बचत केली तेव्हा रितसर आपल्या दीर्घकाळ प्रेयसीशी आंतरजातीय लग्न घरच्यांच्या संमतीने केले. तेव्हा जाणवलं कि हा Mumma's boy आता एकदम man व्हायला लागला होता. त्याचे निर्णय तो घेत होता आणि यशस्वी होत चालला होता. मध्यंतरी एकदा UPSC च्या interview पर्यंत जाऊन अयशस्वी झाला पण त्याची चिकाटी सोडली नाही त्याने. गेल्या वर्षी तो बाप झाला आणि गेल्याच महिन्यात MPSC पास झाला. आणि सुखाची परमसीमा म्हणजे राहुल आज UPSC मध्ये 200 वा क्रमांक पटकावून IAS झालाय.

सुखवस्तू घरातून असताना पण संघर्ष करून स्वतःच्या पैशाने UPSC ची तयारी करायची त्याची स्वाभिमानी वृत्ती कौतुकास्पद आहे. त्याच्या संघर्षाला प्रोत्साहन देणारे त्याचे आई-बाबा ज्यांनी त्याला त्यांच्या आर्थिक स्थैर्याने पंगू होऊ दिले नाही, तेही कौतुकास पात्र आहेत. माझ्यासकट शेकडो मुलांचे आयुष्य बदलणारे Kiran Joshi सर ज्यांनी राहुलला mentor म्हणून नेहमी प्रोत्साहन दिले तेसुद्धा आज भरभरून त्याच्याबद्दल बोलत होते माझ्याशी. आणि या सगळ्यात गेले दशकभर त्याच्यावर निर्व्याज प्रेम करणारी त्याची सहचारिणी मेघा हिचा सर्वात मोठा वाटा आहे राहुलच्या यशात.

Image may contain: 1 person, stripes and indoor
राहुलला  द्रविड प्रचंड आवडतो, इतका कि गेले कित्येक वर्ष त्याचं profile picture द्रविडच आहे. आणि खोलात विचार केला तर या दोन्ही राहुल मध्ये कित्येक साम्यस्थळे दिसतात जसं कि यांची अपार मेहनत, संघर्ष, चिकाटी आणि निष्ठा. प्रसारमाध्यमांच्या चकचकाटात कदाचित डॉक्टरचा मुलगा म्हणून त्याला पेश केलं जाईल आणि समज बनेल कि याला सगळं सहज मिळत असेल म्हणून तो IAS बनला. परंतु राहुलचे यश हे सर्वस्वी त्याचं, त्याच्या संघर्षाच आणि त्याच्या-मेघाच्या प्रेमाचं आहे.
राहुल, तुझा अभिमान आधीही वाटायचाच, पण आज जरा जास्तच वाटतोय. माझा आनंद आज खरंच गगनात मावत नाहीये. तुझ्या भावी वाटचालीला खूप साऱ्या प्रेमळ शुभेच्छा. Love you dude  

- फेसबुक पोस्ट ( १० मे २०१६, २१.४७ )