1980 साली प्रदर्शित झालेला दक्षिण अफ्रिकेतील सर्वोत्तम यशस्वी व्यावसायिक सिनेमा पैकी हा एक सिनेमा. आधुनिक जगापासून पूर्णपणे अनभिज्ञ असलेली आफ्रिकेतल्या कालाहरी वाळवंटातली एक जमात Bushmen. नजर जाईल तिथपर्यंत वाळवंट असल्यामुळे अश्मयुग नाही कि लोहयुग नाही अशा आदिम अवस्थेत जगणारे bushmen स्वतःच्या एका वेगळ्याच छोट्याश्या विश्वात असतात. आणि अशा त्यांच्या जगात एके दिवशी विमानातून एक coca-cola ची काचेची बाटली पडते. आणि तिथून सुरु होतो एक वेगळाच गोंधळ.
उपयुक्त वस्तूंचा मर्यादित पुरवठा मानवी समूहात कसे आंतरिक कलह निर्माण करू शकतो हे त्या छोट्याशा bushmen च्या वस्तीत सुद्धा कळून जाते. त्या कलहातून अहिंसक आणि पापभिरू माणसे पण कशी हिंसक बनू शकतात, मालकी हक्क कसे उदयाला येऊ शकतात हे सगळं खूप हलक्या फुलक्या पद्धतीने दाखवतो हा सिनेमा. आणि हे सगळं होतं एका बाटलीमुळे. आणि मग bushman नायक Xi ती अपशकुनी बाटली जगाच्या बाहेर टाकुन द्यायला निघतो.
वाटेत Xi ला इतर पात्रे भेटतात, एक संशोधक ज्याला बाई समोर वेंधळेपणाचा
झटका येत असतो, एक शिक्षिका, एक मेकॅनिक, शेजारच्या देशातील काही सशस्त्र
बंडखोर आणि खूप सारे प्राणी. प्राणी सोडले तर बाकी साऱ्या गोष्टी Xi ला
आयुष्यात प्रथम दिसलेल्या, तर दुसऱ्या बाजूला नागरी लोकांना आयुष्यात
प्रथमच कळणाऱ्या प्राण्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी. थोडक्यात दोन अज्ञात
विश्वे जेव्हा एकमेकात मिसळतात तेव्हा होणारा एक नाविन्यपूर्ण अनुभव
म्हणजे हा सिनेमा.
या सिनेमा चा अजून एक सिक्वेल पण आला आणि तो पण तसाच नाविन्यपूर्ण होता. विकिपीडिया नुसार 100 million डॉलर कमावणाऱ्या या चित्रपटाच्या नायकाला दिले गेले होते फक्त 2000 डॉलर, थोडक्यात आदिवासी नायकाचे शोषण real life मध्ये पण झालंच नेहमीप्रमाणे. हा सगळा व्यवहार थोडा बाजूला ठेवून, जर साचेबद्ध सिनेमाला कुणी कंटाळले असेल तर हे हे दोन सिनेमे नक्की पाहा, आणि एक नवी अनुभूती घ्या.
- फेसबुक पोस्ट (२५ एप्रिल २०१६, २२.४३)

No comments:
Post a Comment