दोन गोष्टी वाचायला मला जाम आवडतात - कविता आणि legal agreements. कुणीही म्हणेल या दोन गोष्टी किती विरुद्ध टोकाच्या आहेत, म्हणजे कविता एकदम सुरस आणि legal agreement एकदम निरस. पण, खरं पाहायला गेलं तर legal agreement सारखं logical आणि सुंदर document दुसरं कदाचितच कुठलं असेल!
Agreement च्या सुरुवातीच्या definition, त्यातले annexure, त्याचा flow, प्रत्येक clause-subclause, conditions, language सगळंच कसं सुरेख असते. आणि agreement मधल्या प्रत्येक comma, fullstop, capital letter ला खूप मोठा अर्थ असतो. जगातल्या सगळ्या चांगल्या, वाईट शक्यता गृहीत धरून agreement draft करावं लागते.
परवा दिवशी एका Business Development firm ने एक MoU draft पाठवला. Draft म्हणून चक्क pdf file सही, शिक्का मारून पाठवली, जणू काही आम्ही फक्त अंगठा लावायला बसलोय त्यावर. आयुष्यात इतका दळभद्री MoU मी कधीही पाहिला नव्हता. मी त्याची व्यवस्थित autopsy करून त्या firm ला email पाठवून दिली आणि लिहून सांगितले की हे सगळे सुधारून द्या. त्यांचा मला phone आला व संभाषण खालील प्रमाणे झाले -
Firm: हा आमचा standard draft आहे. आमच्या सगळ्या client कंपन्या हा आहे असाच sign करतात. अगदी भारतातल्या सगळ्यात मोठ्या 2 wheeler auto कंपनीसह.
मी: तुमच्या client ना agreement वाचता येत नाही यात माझी काय चूक? मला ह्या terms मान्य नाहीत. बाकी तुमचे client चे corporate lawyers असल्या document वर सही करून देऊ शकत असतील तर त्यांची कंपनी सुद्धा नावावर करून देतील तुम्हाला agreement नीट न वाचता.
Firm: पण सर ते राहू द्या मग annexure मध्ये. जेव्हा गरज असेल तेव्हा ते applicable होईल की.
मी: जेव्हा गरज पडेल तेव्हा नवीन agreement करू की. मी कुठल्याही document वर डोळे झाकून सही करत नाही, तेव्हा सांगितलंय तेवढे करा.
Firm ला कळायचे ते कळले होते. आता त्यांच्या उत्तराच्या प्रतीक्षेत आहे.
बाकी firm च्या शब्दांना पूर्ण खरे मानले तर काही नामांकित भारतीय कंपन्यांनी स्वतःच्या परदेशी कंपनी सोबतच्या Joint Venture मधून येणारा sale मधला काही टक्के हिस्सा या firm ला आधीच लिहून दिलाय, fees वेगळ्याच. आणि सोबत त्यांचा confidential data सुद्धा तसाच देऊन टाकलाय ज्याचा गैरवापर होऊ शकतो.
"मला/आम्हाला कायदा माहित नव्हता." ही सबब जगातल्या कुठल्याही कोर्टात चालत नाही, मग तुम्ही पीडित असा की आरोपी. तेव्हा, legal document वाचायला न येणे यासारखे दुर्दैव कुठलेही नसते.
डॉ. विनय काटे
- फेसबुक पोस्ट ( १८ ऑक्टोबर २०१६, ०८.५७ )
No comments:
Post a Comment