बॉक्स ऑफिस वर आपटलेला असूनही आणि लोकांच्या दोन्ही टोकांच्या संमिश्र
प्रतिक्रिया असूनही गुलजार साहेबांवरच्या अतीव प्रेमासाठी Mirzya पाहिला.
हा सिनेमा खूप अंगाने वेगळा आहे.
राकेश मेहराने सांगितलेली कथा खूप predictable आहे, कदाचित ही कथा आधी माहीत असल्यामुळे अजून जास्तच. पटकथा, गीते गुलजार साहेबांची आहे. कुठेही ओढून ताणून संवाद नाहीत. गीते अप्रतिम आहेत, त्यासाठी गुलजार साहेब आणि शंकर-एहसान-लॉय चे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. दलेर मेहंदीचा आवाज काळजाला भिडतो. हा सिनेमा खरे तर सर्वांगाने musical आहे.

Pawel Dyllus नावाचा पोलिश cinematographer मला प्रचंड भावला. हिंदी
सिनेमा मध्ये अभावानेच इतके सुंदर angles आणि कॅमेरा movements पाहायला
मिळतात. सुरुवातीच्याच scene मध्ये कॅमेरा ज्यापद्धतीने वरून जमिनीच्या
level ला येऊन नंतर झोपडीच्या सांधीतुन ओम पुरीला दाखवत त्याच्याभोवती गोल
फिरतो, ते हिंदी सिनेमात क्वचितच पाहायला मिळालेय आजवर. स्लो मोशन आणि VFX
बेहतरीन आहेत.
हर्षवर्धन कपूर आणि सैयामी खेर निष्प्रभ आहेत. पण supporting actors चा एक नवा संच पाहायला मिळतो, जो खूप कसलेला आहे. Lead actors पेक्षा supporting cast भाव खाऊन जाते. राजस्थान आणि लडाख नेहमीसारखेच डोळ्यांना सुखावून जाते.
ज्यांना 'थोडासा रुमानी हो जाये', 'खामोशी' किंवा 'पहेली' सारखे सिनेमे झेपू शकतात, त्यांनीच Mirzya पाहावा. हा सिनेमा सगळ्यांसाठी अजिबात नाहीये. ज्यांना शब्दांवर आणि संगीतावर प्रेम आहे त्यांनी तर हा सिनेमा अजिबात चुकवू नये. हा niche segment साठीचा सिनेमा आहे, बाकीच्यांना फक्त निराशा पदरी पडेल.
डॉ. विनय काटे
- फेसबुक पोस्ट ( १४ ऑक्टोबर २०१६, २३.५१ )

No comments:
Post a Comment