बऱ्याच लोकांनी पाहिलेली, शेअर केलेली 'अर्थक्रांती' वाल्या बोकील यांची ABP माझा वरची 'माझा कट्टा' मुलाखत काल रात्री पाहिली.
कसलीही नवीन क्रांतिकारी माहिती मिळाली नाही. Highway, diversion, रक्तवाहिन्यातल्या गाठी इत्यादी काहीही उपमा देणे चालू होते. ना काही सखोल अर्थशास्त्रीय विचार ऐकायला मिळाले, ना चलनबदल करतानाची operational पूर्वतयारी काय असायला हवी होती याबद्दल.
१) 86% मूल्याचे चलन बाजारातून काढून टाकल्यावर 97% व्यवहार रोखीने होणारा बाजार कसा ठप्प पडेल याबाबत अवाक्षर ते बोलत नाहीत.
२) बाजारातल्या अचानक आलेल्या चलन तुटवड्यामुळे सामान्य लोकांच्या जीवनावर, अत्यावश्यक सेवा आणि उत्पादने यांच्यावर होणारे दुष्परिणाम आणि त्यांच्यापासून वाचण्यासाठीचे उपाय याबाबत कसलेही ज्ञान ते देत नाहीत.
३) इतक्या प्रचंड मोठ्या किंमतीचे चलन बाद करून अत्यंत कमी वेगाने चलनपुरवठा होतोय, त्याने ग्रामीण अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीशी संबंधित सेवा, उत्पादने आणि शेतमाल यांची दारुण अवस्था कशी होईल हे सांगणे ते शिताफीने टाळतात.
४) वरील मुद्द्यान्वये जर शेतीखालील क्षेत्र, उत्पादने कमी झाली आणि त्याने ग्रामीण भारताचे उत्पन्न कमी होऊन उद्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, अन्नधान्याच्या किंमती गरिबांच्या हाताबाहेर गेल्या तर येणारी अव्यवस्था कशी सांभाळायची यावर काही विचार दिसतच नाही.
५) ग्रामीण भारतातील चलनपुरवठा सुरळीत व्हायला खूप जास्त वेळ लागतो कारण तिथे बँकांचे जाळे कमी आहे आणि ATM ची संख्या पण खूप कमी आहे. भारतातल्या खेड्यात राहणाऱ्या शेवटच्या माणसाला आपण चलन कसे पुरवणार आहोत, किती वेळात पुरवणार आहोत याबद्दल काहीच दृष्टी कशी नसावी?
६) चलनी नोटा बंद करणे हा काही खूप क्रांतिकारी शोध अजिबात नाहीये. भारतातच हा प्रकार 1977 ला मोरारजी देसाईंनी केला होता आणि त्याने काहीही विशेष फरक पडला नाही. तेव्हा 1977 साली भारतीय अर्थव्यवस्था खूप छोटी होती, जगाशी जोडलेली नव्हती, त्यामुळे तेव्हा खूप काही मोठी उलथापालथ दिसली नाही.
आज आपण जगात तिसरी आर्थिक महासत्ता आहोत आणि सगळ्या जगाशी जोडलेलो आहोत. आज अशा अचानक केलेल्या कृतीने अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम शेकडो पट मोठे आहेत. याबद्दल सरकारला काय सल्ला दिला बोकीलांनी हे सांगितलेच नाही.
७) भारतात नेमका काळा पैसा किती आहे... यावर बोकील शिताफीने उत्तर देणे टाळतात. ते प्रणव मुखर्जींच्या खांद्यावर बंदूक ठेवून मोकळे होतात. जर मुळात काळ्या पैशाची व्याप्तीच माहित नाही, तो नेमका किती आणि कुठे गुंतवला गेलाय हे माहित नाही तर त्यासाठी अचानक नोटा बदलून काय मिळाले? काळा पैसा कमावणारे इतके मूर्ख वाटले का की ते फक्त नोटा उशाखाली ठेवून बसतील?
८) काळ्या पैशाचा हवाला देऊन हे सगळे केले गेले तर मग 2000 ची नोट का आणली? या प्रश्नावर बोकील Highway, bypass असले काहीही वेडगळ उदाहरण देतात. 2000 च्या नोटेला सुट्टे करायला 100, 50, 20 आणि 10 च्या नोटाच नाहीत तर 2000 च्या नोटा घेऊन करायचे काय?
९) UN रिपोर्ट नुसार 70% लोक (प्रामुख्याने शहरी गरीब, आदिवासी आणि अल्पभूधारक शेतकरी, मजूर) या देशात दरदिवशी 130 रुपयांपेक्षा कमी पैशात जगतात, त्या देशात 100, 50, 20 आणि 10 च्या नोटा कधी आणि कशा वाटल्या जाणार आहेत?
हे काही मोजके प्रश्न मला पडलेत आणि माझ्याहीपेक्षा कित्येक पटीने जास्त प्रश्न इथल्या जनतेला पडलेत.
पण बोकीलांना असे बोचरे प्रश्न, पक्षी कसलेही प्रश्नच विचारायचे नाहीत हे ठरवून संपादक, पत्रकार अगदी भक्तिभावाने समोर बसले होते. हा पत्रकारितेचा नवा प्रकार पाहायला मिळाला. बोकील अगदी खऱ्या अर्थाने 'कट्ट्यावर' बसून बोलावे तसे बोलत होते. पत्रकारितेतून आणि राजकीय/आर्थिक सल्लागारांतून अभ्यास आणि अक्कल कशी परागंदा होत चाललीय हे पाहताना खरंच त्रास झाला.
बोकील हे कुठल्याही अर्थाने अर्थशास्त्रज्ञ नाहीयेत. त्यांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितलेल्या सगळ्या गोष्टी या अत्यंत बाळबोध होत्या, 'सुगम अर्थशास्त्र' वगैरे बालकांच्या क्रमिक पुस्तकात शोभून दिसल्या असत्या. आणि अशा व्यक्तींच्या सल्ल्यावरून मोदींनी हा एवढा मोठा आत्मघातकी निर्णय घेतला असेल तर मोदी हे 21 व्या शतकातले तुघलक आहेत यात मला तरी तीळमात्र शंका नाही!
- डॉ. विनय काटे
फेसबुक पोस्ट ( १६ नोव्हेंबर २०१६, १९.०० )

No comments:
Post a Comment