Saturday, January 21, 2017

पैशासाठी रांग

राहुल गांधी रांगेत उभारल्यावर मोदिशेठ गर्जले "ज्यांनी 2G चे घोटाळे केले ते रांगेत उभा आहेत."

नंतर शेठ अजून एका ठिकाणी बोलले "ज्यांनी काळा पैसा साठवलाय ते रांगा लावून उभे आहेत'.

शेठ, आपल्या मातोश्रींनी वरील दोन्ही पैकी काय केलंय कि त्यांना रांगेत उभारावे लागले??

मी सांगू, आपल्या मातोश्रींनी किंवा भारतातल्या 99.99% माता-भगिनींनी काहीही घोटाळा केला नाहीये किंवा काळा पैसा साठवला नाहीये.

त्या 95 वर्षांच्या आईला मनापासून नमन, जिला या वयातसुद्धा आपल्या मुलाच्या मूर्खपणावर पांघरून टाकायला विनाकारण रांगेत उभे राहावे लागतेय _/\_

बाकी तुमच्या प्रामाणिकपणाचे दर्शन तुमच्या लाखो रुपयांच्या सूट मध्ये होतंच, जे तुम्ही 5 तासात 3 वेळा बदलता गोवा-बेळगाव-पुणे प्रवासात!!

 - डॉ. विनय काटे

फेसबुक पोस्ट ( १५ नोव्हेंबर २०१६, १५.४५ )

No comments:

Post a Comment