देशासाठी मरण पत्कर
मॅनहोल मध्ये गुदमरून,
कर्जासाठी फास घेऊन,
कुपोषण, TB आणि जुलाब होऊन,
ATM, बँकेच्या रांगेत उभा राहून,
VIP च्या ताफ्यासाठी अडलेल्या अँब्युलन्स मध्ये तडफडून,
पुराच्या पाण्यात वाहलेल्या पुलावरून पडून,
खड्ड्यांच्या रस्त्यात अपघातात मरून,
बाबा लोकांच्या धार्मिक उत्सवात चेंगरून,
दारूच्या नशेत चालवलेल्या BMW, Audi खाली येऊन,
फ्रिजमधले मांस पाहून खवळलेल्या जमावाकडून,
ऑनर किलिंग मध्ये बळी होऊन,
जातीच्या मस्तीत झालेल्या अत्याचारातून,
कॉर्पोरेट विश्वाने पोसलेल्या सशस्त्र दलांकडून,
नकली एन्काऊंटर मध्ये असली गोळ्या खाऊन,
'जीवनाचा अधिकार' हा मूलभूत हक्क असणाऱ्या देशात तुला मरायला इतकी करणे आहेत म्हणून ....
देशासाठी खरंच मरण पत्कर!
- डॉ. विनय काटे
फेसबुक पोस्ट ( ३० नोव्हेंबर २०१६, १४.३६ )

No comments:
Post a Comment