Forbes ने अमेरिकेतील 400 अब्जाधीश लोकांच्या शिक्षणाचा आढावा घेतला. शैक्षणिक पात्रता पाहता स्थिती अशी आहे -
1) 63/400 - हायस्कुल डिप्लोमा
2) 35/400 - Law डिग्री
3) 29/400 - MS
4) 21/400 - Phd
5) 5/400 - डॉक्टर
बिल गेट्स असो, स्टीव्ह जॉब्स असो, झुकरबर्ग असो की अगदी भारतातील अंबानी, अदानी असोत... बहुतांश लोक college drop-out म्हणजे फक्त हायस्कुल (10वी, 12वी) शिकलेत.
आता तुम्हाला वाटेल की कुणाला अब्जावधींची उलाढाल करणारा मोठा बिझनेस चालवायचा असेल तर शिक्षणाची जास्त गरज नाही... हो ना?
पूर्णतः चूक!
हे सगळे बिझनेसमन कमी शिकलेले असले तरी, यांच्या एकाच्याही कंपनीत entry level job ला सुद्धा कमी शिकलेली माणसे घेतली जात नाहीत, middle किंवा top management मध्ये तर सोडूनच द्या. आणि यांच्या कंपन्यांच्या board/director मध्येपण स्थिती अजिबात वेगळी नसते. जुन्या काळात सुद्धा राजे अडाणी असले तरी त्यांचे सल्लागार शिकलेले असत. आजच्या घडीला मुरब्बी राजकारणीही हा नियम पाळतात.
राज्य असो की धंदा, मोठं व्हायचं असेल तर शिक्षणाला, शहाणपणाला आणि Vision ला पर्याय नाही. कारण, याच गोष्टी बिझनेसचे मूलभूत नियम पाळायला मदत करतात. ज्यांनी बिझनेसचे मूलभूत नियम पाळले नाहीत, ते आज ना उद्या किंगफिशर आणि सहाराच्या रांगेत जाऊन बसतात, मग त्यांचा आकार कितीही मोठा असो.
डॉ. विनय काटे
- फेसबुक पोस्ट ( १७ ऑक्टोबर २०१६, ०७.२५ )

No comments:
Post a Comment