Thursday, January 5, 2017

नफा

जगात तीन प्रकारचे लोक असतात -

१) स्वतःला टेलिफोन बनवता येतो म्हणून तेवढेच यंत्र बनवून विकणारे

२) जगाला टेलिफोन पाहिजे म्हणून ते यंत्र बनवायला सुरु करून विकणारे

३) टेलिफोनच्या नादी न लागता cellphone बनवणारे आणि टेलिफोनचे अख्खे मार्केट उलथवणारे

पहिल्या प्रकारच्या लोकांचा धंदा specialized supplier चा असतो आणि कालांतराने बंद पडतो.

दुसऱ्या प्रकारच्या लोकांचा धंदा demand catering supplier चा असतो, थोडेफार फेरफार करत जरा जास्त काळ चालतो.

तिसऱ्या प्रकारच्या लोकांचा धंदा product innovation वर असतो, आणि ते धंद्यात तुलनेने सगळ्यात जास्त काळ टिकून राहतात.



प्रश्न: सगळ्यात जास्त नफा, सगळ्यात जास्त काळ कोण मिळवते?

उत्तर: तुम्हाला जर तिसऱ्या प्रकारचे लोक हे उत्तर वाटत असतील तर चूक आहे.

उत्तर आहे, चौथ्या प्रकारचे लोक ... जे ह्या तिन्ही लोकांचे products एकाच वेळी विकत असतात, ज्यांना traders म्हणतात. इंटरनेट आणि दळणवळणाने जोडलेल्या जगात झपाट्याने मोठे होणारे बहुतांश बिझनेसमन product manufacture करत नाहीत, तर फक्त trade करतात.

डॉ. विनय काटे

- फेसबुक पोस्ट ( १५ ऑक्टोबर २०१६, १२.४६ )

No comments:

Post a Comment