मोठ्या शहरात माणसाने कार विकत न घेता Uber, Ola टॅक्सी का वापरावी?
कार विकत घेताना खूप सारे खर्च आपण जोडून घेत असतो. उदाहरणार्थ -
1) कारची किंमत, जी दरवर्षी साधारण 15-20% घसरते
2) कारच्या किमतीवरचे चुकलेले व्याज/ कारकर्जाचा EMI
3) पेट्रोल/डिझेल चा खर्च
4) Servicing चा खर्च
5) टायर, इतर wear & tear चा खर्च
6) किरकोळ अपघातात डेन्ट आणि पेंट चा खर्च
7) Insurance, PUC, ट्रॅफिकचे दंड इत्यादी

साधारणपणे 6-7 लाख रुपयांची कार घेतली तरी दिवसाला शहरातल्या शहरात 30
किमी जरी गाडी चालवायची, तरी हे सगळे खर्च मिळून वर्षाला किमान 2 ते 2.5
लाखाच्या आसपास पोहोचतात. त्यात जर तुम्ही ड्रायव्हर ठेवला असेल तर अजून
1.5 लाख वाढवून घ्या.
आणि आता जर तुम्ही रोज 30 किमी Uber, Ola सारख्या टॅक्सीने फिरला तर प्रति किमी 9-10 रुपयांच्या हिशेबाने तुम्ही वर्षाला खर्च करता फक्त एक लाख! आता हा घसघशीत आर्थिक फायदा सोडून बाकीचे फायदेही आहेत, जसे की -
1) ड्रायव्हिंग करायच्या कटकटीपासून मुक्ती, अधिक सुरक्षित प्रवास
2) AC गाडीत फिरत, दिवसाचे दीड-दोन तास (30किमी शहरातल्या ट्रॅफिक मधून जायला लागणारा वेळ) बाकीचे काम करता येते किंवा आराम फर्मावता येतो
3) रोज नवनवीन गाडी आणि नवनवीन ड्रायव्हर
4) Eco Friendly असणे - कारण तुम्ही फक्त 2-3 तास गाडी वापरता आणि बाकीचे लोक तीच गाडी उरलेल्या वेळेत भाड्याने वापरत असतात. त्यामुळे नैसर्गिक संसाधनाची बचत, कमी carbon footprints
5) कमी ट्रॅफिक जॅम - आजकाल टॅक्सी शेअर पण करता येते ज्याद्वारे ऑफिस ला येता-जाता 3-4 लोक एकच ride शेअर करून पैसेही वाचवू शकतात, अधिक रस्त्यावर येणारी वाहने कमी होऊन ट्रॅफिक जॅम कमी होतात
6) रोजगार/ व्यवसाय निर्मिती - आधी दुसऱ्यांकडे ड्रायव्हर म्हणून रोज 12 तास काम करून महिना 12,000 पगार घेणाऱ्या अनेक लोकांनी आता स्वतःच्या मालकीच्या टॅक्सी घेऊन स्वतः अधिक ड्रायव्हर असे 24 तास ती टॅक्सी चालवून महिना 60 ते 70 हजार उत्पन्न कमावलय, ज्यात सगळे खर्च जाऊन 30 हजार महिना तरी निव्वळ नफा राहतो. अधिक एका ड्रायव्हर ला रोजगार पण मिळतो. देशाच्या आर्थिक प्रगतीला थोडा हातभार पण लावता येतो.
तेव्हा स्मार्ट बना, शहरात पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा टॅक्सी वापरा ... फायदेच फायदे आहेत
:)
मी गेले 3.5 वर्ष फक्त Uber वापरतोय, क्वचितप्रसंगी Ola किंवा Meru. माझे वरचे analysis ऐकून माझ्या ऑफिसमधल्या मैत्रिणीने स्वतःची एकमेव कार विकून टाकली आणि दुसरी बुक केलेली cancel करून टाकली. तिचे पैसे आणि त्रास वाचवल्याबद्दल पार्टी दिली होती ते वेगळेच!
डॉ. विनय काटे
- फेसबुक पोस्ट ( १७ ऑक्टोबर २०१६, १९.४४ )

No comments:
Post a Comment