कलंगूट किंवा बागा बीच वरची भारतीय लोकांची गर्दी पाहून क्षणभर वाटते की आपण कुंभमेळ्यात तर आंघोळ करायला आलो नाहीये ना?
मधुचंद्रवारीला आलेल्या उत्तर भारतीय नववधू म्हणजे तर 'सेक्स आणि संस्कार' यांच्यामध्ये ताणलेल्या दोरीवरची अवघड कसरतच करतात जणू. अंगात खोल गळ्याच्या आणि कमी लांबीचा spaghetti, त्यातून दिसणारे अंतर्वस्त्र, उघड्या पाठीवरचे तात्पुरते tattoos आणि कोपरापर्यंतचा लाल चुडा आणि गुडघ्यापर्यंत मेहंदी! ना धड भारतीय, ना धड विदेशी !!
गोव्यात खरंच चांगला बीच पाहायचा असेल तर Palolem किंवा Bogmalo ला पर्याय नाही. बाकी दुसरे बीच म्हणजे गणपतीपुळे - मंदिर + बार.
डॉ. विनय काटे
- फेसबुक पोस्ट ( ४ नोव्हेंबर २०१६, ०९.११ )
No comments:
Post a Comment