Saturday, January 21, 2017

मित्र

मंगल कमळू शिद,
रा. मानेची वाडी, मुरबाड तालुका

एक आदिवासी मित्र जो काहीही चांगलं खायला मिळालं की मला न चुकता आणून द्यायचा.... मग ती आंबे, जांभळे असोत की मासे, चिंबोऱ्या की एखादी शिकार.

माझ्यापेक्षा 15 एक वर्षाने मोठा असणारा, अगदी लंगोट लावून गुरे हाकत फिरणारा मंगल, माझ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जवळ आला की न विसरता भेटून जायचा. आणि सोबत जे काही खायचे असेल ते देऊन जायचा.

आयुष्यात काही मित्र निखळ आणि निष्पाप प्रेम करतात, आणि वाईट हे की त्यांचा सहवास खूप कमी काळ मिळतो.

 - डॉ. विनय काटे

फेसबुक पोस्ट ( ३० नोव्हेंबर २०१६, २१.४२ )

No comments:

Post a Comment