Friday, January 6, 2017

हिटलर, राज ठाकरे ते मोदी -

हिटलरच्या मागे करोडो लोक वेड्यासारखे किमान दशकभर उभे कसे राहिले हा प्रश्न खूप लोकांना पडतो. हिटलर ने जे केलं त्याला मानसशास्त्रीय परिभाषेत Suggestion असं म्हणतात. स्वतःच्या आदेशांनुसार दुसऱ्या माणसाचे वर्तन, प्रतिकिया त्याने नियंत्रित करता येतात. Hypnosis वगैरे त्याचाच एक भाग. समूह पातळीवर पण ते करता येत.

हिटलरच्या स्टेजवर फक्त तो एकटाच असायचा, स्टेज उंच असायचं, त्याच्या चेहऱ्यावर उजेड आणि बाजूने blackout असायचं आणि ऐकू यायचा फक्त त्याचाच आवाज. या lights आणि sounds ने हिटलर लोकांना मोहून टाकायचा, सामूहिक hypnosis मध्ये न्यायचा. Background मध्ये हिटलरच्या जयघोषाच्या घोषणा दिल्या जात, त्यामुळे लोक अजून जास्त भारावून जात आणि हिटलर जे बोलतोय त्याला खरे मानत, त्याच्या आक्रस्ताळ्या भाषणांना अभ्यासपूर्ण समजत. आणि जितकी मोठी सभा, तितके हे नेपथ्य अजून मोठा परिणाम देई कारण समूहात माणसाच्या विवेकाला, तर्काला गाढुन टाकायची शक्ती असते. हिटलरने याच सगळ्या मानसशास्त्रीय क्लृप्ती वापरून सामान्य लोकांपासून ते विद्वानांपर्यंत लोकांचा बुद्धिभ्रम केला.

हिटलरचेच तंत्र कमी अधिक प्रमाणात पण चांगल्या अर्थाने जगप्रसिद्ध पॉपस्टार्सनी पण वापरले. मायकेल जॅक्सन असो की अजून कुणी, live concert मध्ये लोक बेशुद्ध होऊन पडतात ते याच ट्रान्स मुळे. धार्मिक क्षेत्रांत जॉयस मेयर, पॉल दिनकरन आदी ख्रिस्ती मिशनरींनी हे तंत्र वापरले आणि लोकांना भयमुक्त, रोगमुक्त केल्याचे तात्पुरते चमत्कार सुद्धा केले.

भारतातल्या राजकारण्यांच उदाहरण घ्याल तर मोदींच्याही आधी राज ठाकरेंनी हे तंत्र वापरले. त्यांच्या सभांना अभूतपूर्व गर्दी व्हायला लागली, मराठी लोक वेड्यासारखा उत्तर भारतीयांचा द्वेष करायला लागले आणि प्रसंगी हिंसक सुद्धा झाले. कसलेही राजकीय कार्यक्रम नसणारा पक्ष 13 आमदार जिंकून आणता झाला. राज ठाकरेंचे स्टेज आठवा, lights, कॅमेरा आणि त्यातल्या घोषणा, आवाज आठवा.... ती हिटलरची नक्कल होती. आणि त्या नक्कलीला मराठीच काय, देशभरातील मीडिया भुलला, त्यांना पाहिजे तितके फुटेज देऊन बसला. राज ठाकरेंचा श्रोतावर्ग फक्त मराठी असल्याने हा प्रयोग दीर्घकाळ टिकला नाही.

मोदींनी मात्र हा प्रयोग अत्यंत मोठ्या प्रमाणावर केला आणि त्यांचा audience जगभर पसरलेला होता. तसेच स्टेज, तसेच प्रकाशझोत, कडेने blackout, 'मोदी, मोदी' च्या घोषणा, ओढूनताणून आणलेले परकीय नेते, कलावंत हे लोकांना भारावून टाकायला पुरेसे होते. ह्याच्या जोडीने विकत घेतलेला मीडिया, अखंड पैसे पुरवणारे उद्योगपती आणि सोशल मीडिया वरची ट्रोल ची आर्मी ह्याद्वारे मोदींनी त्यांच्या सभांचा फील समस्त लोकांना घरबसल्या दिला. कित्येक सामान्य लोकांना ते भक्त कधी झाले हेच कळले नाही आणि आजही त्यातल्या कित्येक जणांना ते भक्त आहेत हेही मान्य होणार नाही. Mass hysteria झाल्यासारखा मीडिया आणि आणि सामान्य लोक या वेडात बुडून गेले.

हिटलर असो, राज ठाकरे असोत की मोदी.... सगळ्यांची कार्यशैली आणि व्यक्तिमत्व बऱ्यापैकी एकसारखेच समाजघातकी आहे. आणि त्यांच्यामागे कळपाने चालणाऱ्या लोकांना ते बरीच वर्षे कळणारही नाही. मोदींच्या काळात भारत देशाने काय हरवलंय हे कळायला येणारे अजून किमान 5-6 वर्षे जावी लागतील. तोवर फक्त भक्तांना सहन करत राहा!

- डॉ. विनय काटे

फेसबुक पोस्ट ( ८ नोव्हेंबर २०१६, १०.१३ )

No comments:

Post a Comment