Thursday, January 5, 2017

अस्मिता

1) पॅरिस बंद -
सम्राट लुई (14 वे) यांच्याबद्दल Whatsapp वरून बदनामीकारक मजकूर लिहून फ्रेंच अस्मितेला धक्का पोचवल्यामुळे निषेध म्हणून आज पॅरिस बंद पुकारण्यात आलेला आहे.

2) केनेडी स्ट्रीट चे नामांतर-
आताच नव्याने सत्तेत आलेल्या रिपब्लिकन सरकारने केनेडी स्ट्रीट चे नाव बदलून लिंकन स्ट्रीट असे केले आहे.

3)"ज्यांना God save the Queen गायचे नसेल त्यांनी इटलीला जावे" - ब्रिटिश राष्ट्रप्रेमी संघाचा इशारा

4) "Calculator वर इंग्रजी सोबत रोमन आकडे पण असायलाच पाहिजेत" - रोमन नवनिर्माण सेना
असल्या बातम्या कधी ऐकायला मिळाल्या तुम्हाला तर मला पण कळवा. भारत-पाकिस्तान ला समविचारी देश मिळाले म्हणून आनंद होईल मला

डॉ. विनय काटे

- फेसबुक पोस्ट ( २१ ऑक्टोबर २०१६, ०९.२४ )

No comments:

Post a Comment