Thursday, January 5, 2017

आपल्याला एखादी वस्तू/व्यक्ती का आवडते/नावडते?


कुठल्याही व्यक्तीला असंख्य वस्तूंमधून एखादी वस्तू जास्त का आवडते, याच उत्तर आहे attributes मध्ये. जेव्हा आपण एखादी वस्तू खरेदी करतो तेव्हा आपण त्या वस्तुकडून असणाऱ्या आपल्या अपेक्षांचे attributes मनात सुप्तपणे नोंदवत असतो. त्या प्रत्येक attribute ला आपण preference आणि weightage देतो. आणि त्या प्रत्येक attribute वर येणारा score ची बेरीज करून आपण त्या वस्तूची value/मूल्य ठरवतो. ते value/मूल्य (किंमत नाही) जितके जास्त असेल तितकी ती वस्तू आपल्याला आवडते. आणि हे सगळं आपल्याला नकळत मनातल्या मनात होत असते.

उदाहरणार्थ, समजा मला मला शर्ट खरेदी करायचा आहे. माझ्यासाठी attributes आणि त्यांचे weightage (% मध्ये - बेरीज 100% यावे असे) खालील प्रमाणे असू शकतील -

1) कापडाचा दर्जा - 20% किंवा 0.2
2) रंग - 10%
3) ब्रँड - 30%
4) किंमत - 15%
5) फॅशन - 10%
6) भावनिक मूल्य - 15%

आता समजा माझ्यासमोर 2 शर्ट A आणि B ठेवलेत ज्यात वरील 6 attribute वर अनुक्रमे माझा 10 पैकी score असा आहे -
A: 7, 6, 8, 3, 9, 5
B: 4, 6, 7, 5, 3, 8

आता A आणि B साठी value काढताना मला प्रत्येक attribute च्या weight ला (weightage व्यक्ती साठी छोट्या कालावधीत बदलत नाही) त्याच्या score ने गुणून बेरीज करावी लागेल, जी अशी होईल -
A: (0.2*7) + (0.1*6) + (0.3*8) + (0.15*3) + (0.1*9) + (0.15*5) = 1.4+0.6+2.4+0.45+0.9+0.75 = 6.5
B: (0.2*4) + (0.1*6) + (0.3*7) + ( 0.15*5) + (0.1*3) + (0.15*8) = 0.8+0.6+2.1+0.75+0.3+1.2 = 5.75

थोडक्यात, माझ्यासाठी A ची value 6.5 आहे तर B ची 5.75 आहे म्हणून मी A हा शर्ट निवडेन आणि B ला नकार देईन.

तुम्ही साड्यांच्या दुकानात गेला की तिथले सेल्समन तुम्हाला विचारतात -कुठली साडी दाखवू? 6वारी कि 9वारी? काठ-पदर की प्रिंटेड? पैठणी कि कांजीवरम? किती बजेट मध्ये दाखवू? रंग कुठला हवाय?

हे सगळे प्रश्न तुमचे attribute चे weightage कळायला तो विचारत असतो जेणेकरून कमी वेळात तुम्हाला तुमच्या लेखी जास्तीत जास्त मूल्य असणारी साडी दाखवू शकतो. प्रत्यक्षात हे ग्राहकाच्या मनातले weightage आणि score चे गणित ना सेल्समनना माहित असते, ना खुद्द ग्राहकाला! कारण, प्रत्येक ग्राहकासाठी attribute वेगळे असतात, त्यांचे weightage वेगळे असते आणि दोन वेगळे ग्राहक एकाच वस्तूला एकाच attribute वर वेगवेगळा score देऊ शकतात.

जी गोष्ट वस्तूंची तीच माणसांच्या बाबतीत असते. आपण प्रत्येक माणसाला attribute, weightage, score आणि overall value नुसार आवडते किंवा नावडते म्हणतो. आणि व्यक्तीसापेक्ष हे सगळे बदलते.

यावरून ध्यानात घेण्यासारखी एक गोष्ट आहे ती अशी की मला ज्या वस्तू/व्यक्ती अत्यंत प्रिय (value ने जास्त) असू शकतात, अगदी त्याच वस्तू/व्यक्ती दुसऱ्या 'क्ष' नावाच्या व्यक्तीला अत्यंत अप्रिय असू शकतात. आणि हे सुद्धा शक्य आहे की अजून काही वर्षांनी मला आजच्या प्रिय व्यक्ती/वस्तू उद्या अप्रिय असू शकतील आणि 'क्ष' व्यक्तीला त्याच वस्तू/व्यक्ती प्रिय असू शकतील. कारण, प्रत्येक माणूस त्याचे attribute, त्या attribute चे weight आणि त्यावरचे score वेळेनुसार बदलतो. त्यामुळे आजचा आवडता शर्ट काही दिवसांनी नकोसा होतो, नवीन लग्न झाल्यावर आवडती असणारी बायको काही वर्षांनी कटकट होते.

तेव्हा, तुमच्या आवडी-निवडी, विचार, अनुभूती आणि व्यक्ती/वस्तुंना तुमच्या लेखी असणारे मूल्य हे सातत्याने बदलणार आहे. आणि या गोष्टी बदलतात म्हणून जगात कुठलीही वस्तू/व्यक्ती/विचारप्रवाह हे कालबाह्य/out of market ठरत नाही. त्यांना जवळ करायला कुठला ना कुठला ग्राहकवर्ग नेहमी तयार असतो. Bell bottom ची पॅण्ट फिरून फिरून बाजारात येत राहील, नवनव्या रुपात. परंपरा फिरून येतील परत परत नव्या रुपात. आणि जगात सगळे विचारप्रवाह टिकून राहतील कायमस्वरूपी, मग तो मार्क्सचा communism असो, हिटलरचा वंशवाद असो, साम्राज्यवाद असो, नास्तिकता असो, आस्तिकता असो की अंधश्रद्धा असोत .... कारण त्या प्रत्येकाला एक ग्राहकवर्ग सदैव उपलब्ध असणार आहे. त्यांचे स्वरूप थोडेबहुत बदलेल पण जगात काहीही नष्ट होणार नाही जोवर मानवजात जिवंत आहे.

डॉ. विनय काटे

- फेसबुक पोस्ट ( १४ ऑक्टोबर २०१६, १२.०१ )

No comments:

Post a Comment