माणूस निसर्गतः Polygamous आहे, जवळपास एक
दशलक्ष वर्षांपासून. तुलनेत विवाहसंस्थेने मानलेल्या एक पती/पत्नी व्रताला
फक्त 4-5 हजार वर्षांचा इतिहास आहे. त्यामुळे कुणी मी Polygamous आहे
म्हणून झेंडा फडकवत असेल तर मला तरी हसू येतं.
भल्या स्त्रीये/पुरुषा .... इथे माझ्यासकट सगळेच polygamous आहेत, फरक एवढाच आहे की कुणी समाजाच्या, संसाराच्या, जीवाच्या भीतीने ती polygamy फक्त मनात ठेवते, तर बहुतांश जण करून सवरून शांतता बाळगतात.
संत कबीरा सारखा माणूस सुद्धा कधी काळी लिहून गेलाय -
"मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर,
ना खिंची कमान तो, कहां चलेगा तीर।"
अगदी महाभारतात सुद्धा ५ पांडवांना वरूनही द्रौपदीचे मन कर्णावर गेलेच, भले काही क्षणांसाठी का असेना!
उत्क्रांत झालेल्या मेंदूमुळे मानव हा एकमेव प्राणी आहे जो आनंदासाठी संभोग करतो. बाकीचे प्राणी फक्त प्रजनन व्हावे म्हणून संभोग करतात. आणि माणसाच्या आनंदासाठी संभोग करण्याच्या क्षमतेमुळे माणूस संभोगातही वैविध्य, नाविन्य आणायचा प्रयत्न करतो. असे प्रयत्न एका विशिष्ट हद्दीत experience असतात, थोडं अती झालं की ते perversion सारखी विकृती होतात, आणि पारच कडेलोट झाला की त्यात rape सारखी हिंसकता पण येते.
निर्विवादपणे संभोग ही एक सुंदर आणि आनंददायी गोष्ट आहे जर तो दोन सज्ञान लोकांनी एकमेकांचे मानवी अस्तित्व, भावना सांभाळून, त्यांचा आदर करत स्वेच्छेने केला तर. माजावर आलेल्या गायीला झाडाला बांधून तिच्यावर एक नारळ आणि शे-दीडशे रुपयांचा मोबदला घेऊन वळू लावणे याला संभोग म्हणत नाहीत.
आजकाल दोन प्रजातीचे पुरुष सापडतात ज्यांना आपली मर्दुमकी सेक्स मध्ये दाखवताना खालील वाक्ये बोलावी लागतात -
१) "किती जणींचा कौमार्यभंग मी केला तुला माहित आहे?" किंवा "दुसऱ्यासोबत झोपलेली पोरगी तू कशी बायको म्हणून केलीस?" असल्या योनिशुचीतेच्या निलाजऱ्या गप्पा मारणारी संस्कृतीरक्षक मंडळी... आणि
२) "इतके condom घेऊन आलोय, इतक्या जणीसोबत झोपून, इतके condom शिल्लक परत घेऊन चाललोय" असल्या बाता करणारी स्वतःला आणि दुसऱ्याला फक्त एक उपभोग्य वस्तू समजणारी वृत्ती. हीच वृत्ती कधी शेन वॉर्न सारखी लोक दाखवतात 'मी इतक्या हजार मुलींसोबत झोपलोय" म्हणून सांगत किंवा किम कार्डाशियन सारख्या स्त्रिया पण दाखवतात स्वतःचे sex videos पब्लिक करून त्याचे पैसे मिळवून.
लग्नाआधी आणि लग्नानंतरही polygamy ला माझा अजिबात विरोध नाही, कारण हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण "मी इतक्या जणींना/जणांना झोपवले" हे जाहीरपणे सांगत स्वतः काहीतरी जगापेक्षा मोठे आहोत दाखवणारे लोक हे फक्त "गायीला वळू दाखवणे" या प्रकारात येतात. त्यांना संभोग आणि प्रणय हा जितका शारीरिक असतो त्यापेक्षाही जास्त मानसिक गुंतवणुकीचा असतो हे माहीतच नसते. आणि ज्यांना आपल्या संभोगातील पार्टनरच्या भावनांबद्दल थोडेही सोयरसुतक असते, ती माणसे त्यांच्या संभोगाच्या, प्रणयाच्या गप्पा आणि त्यांचे तपशील असे पारावर उभा राहून दवंडी पिटवून सांगत नसतात.
Polygamy या देशात काही अपवाद वगळता (देवदासी, सक्तीची वेश्यावृत्ती इत्यादी) खूप सुंदर पद्धतीने जगली गेलीय. दोन नग्न शरीरांची भावनाहीन घुसळण आणि त्याचे उत्तान जाहीर प्रदर्शन याच्याहीपेक्षा खोलवर असलेलं शारीरिक आणि भावनिक संभोगांचं नातं इथल्या लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने जपलंय, ज्यात प्रेम आहे, हळुवारपणा आहे. पॉर्नमधल्या रानटी सेक्सला संभोग (सम भोग) समजणाऱ्या स्त्री-पुरुषांना "मी मज हरपून बसले गं" या सुरेश भटांच्या गाण्यातील शब्दांतला आणि आशाबाईंच्या आवाजातला प्रणयाचा परमोच्च बिंदू कधीही कळणार नाही.
आमचा कृष्णही polygamous होता बरं का!
- डॉ. विनय काटे
फेसबुक पोस्ट ( ०६ डिसेंबर २०१६, १८.०७ )

No comments:
Post a Comment